Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रECI vs Congress : शेवटच्या तासात मतदानाचा टक्का कसा वाढला? आयोगाने दिले...

ECI vs Congress : शेवटच्या तासात मतदानाचा टक्का कसा वाढला? आयोगाने दिले हे स्पष्टीकरण

Subscribe

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपसह महायुतीने बहुमताचा आकडा सहज गाठला आणि 288 पैकी 230 जागांवर विजय मिळवला. तर, महाविकास आघाडीला फक्त 46 जागांवर विजय मिळवता आला. या अनपेक्षित निकालावर अनेक सवाल उपस्थित करण्यात आले. महायुतीच्या विरोधात असलेल्या काँग्रेससह महाविकास आघाडी, मनसे, वंचित बहुजन आघाडी तसेच अपक्षांनीदेखील निकालावर सवाल उपस्थित केले. गुरुवारी (28 नोव्हेंबर) काँग्रेसने पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगाच्या कारभाराबाबतही आक्षेप घेतला आहे. अगदी शेवटच्या तासात मोठ्या प्रमाणात वाढलेल्या टक्केवारीचा पुरावा निवडणूक आयोगाने द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. त्यावर आता निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिले आहे. (Election commission of India clarifies on polling increase in last hours)

हेही वाचा : Eknath Shinde : फडणवीस आणि अजित पवारांनी फोटो केले शेअर; पण… दिल्लीचे वास्तव काय? 

- Advertisement -

विधानसभा निवडणुकीच्या मतदानादिवशी राज्यात संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 58.22 टक्के मतदान झाले होते. पण त्यानंतरच्या तासात 65.2 टक्के मतदान झाल्याचे समोर आले. त्यावर आता निवडणूक आयोगाचे महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी स्पष्टीकरण देत म्हंटले की, “संध्याकाळी शेवटच्या तासात मतदानाचा टक्का वाढणे, ही एक सामान्य बाबा आहे. कारण निमशहरी आणि शहरी भागात शेवटच्या काही तासात मतदानासाठी मतदार मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडतात. त्यामुळे हा टक्का वाढतो. संध्याकाळी 6 वाजण्याच्याआधी जो मतदार रांगेत येऊन उभा राहतो, त्याचे मतदान संपेपर्यंत मतदानाची प्रक्रिया सुरूच राहते. ही रांग संपण्यासाठी कधी कधी 6 वाजण्याची मर्यादाही पुढे जाते. 2019 या वर्षात संध्याकाळी 5 वाजता जवळपास 58.22 टक्के मतदान झाले होते. त्यानंतर अंतिम मतदानाची आकडेवारी 66.05 टक्के झाली होती.” असे म्हणत विरोधकांचे आरोप खोडून काढण्याचा प्रयत्न त्यांनी केला.

- Advertisement -

झारखंडमध्येही मतदान कमी झाल्याचे समोर आले होते. यावरही चोक्कलिंगम यांनी स्पष्टीकरण दिले आहे. “झारखंडमध्ये संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मतदान चालते, तर महाराष्ट्रात 6 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू असते. झारखंडमध्ये बहुतेक ग्रामीण भाग असल्यामुळे तिथे सकाळीच मतदान करण्यावर भर दिला जातो. पण महाराष्ट्रात संध्याकाळी 5 नंतरही अनेक मतदार बाहेर पडून मतदान करतात. तसेच झारखंडमध्ये केवळ 30 हजार मतदान केंद्रे होती, तर महाराष्ट्रात 1 लाखाहून अधिक मतदान केंद्र उभारण्यात आली होती,” असे ते म्हणाले.


Edited by Abhijeet Jadhav

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -