Breaking : आज निवडणुकांच्या तारखांची घोषणा होणार

Determination of the election schedule of the election commission
निवडणूक आयोगाचे दरपत्रक निश्चित

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज संध्याकाळी २०१९ लोकसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा होणार आहे. आज संध्याकाळी ५ वाजता निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे. याचवेळी आगामी लोकसभा निवडणुकींच्या तारखा जाहीर केल्या जातील अशी माहिती मिळाली आहे. लोकसभेसह आंध्रप्रदेश, ओडिशा, अरूणाचल प्रदेश, सिक्कीम या राज्याच्या विधानसभा निवडणुकाही जाहीर होणार आहेत. महाराष्ट्र- हरियाणामधे लोकसभा निवडणुकीसोबत विधानसभा निवडणुका होणार नाहीत. निवडणुकांविषयी गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या वावड्यांना या घोषणेमुळे पूर्णविराम मिळणार आहे.

तारीख जाहीर झाल्यानंतर लगेचच आचारसंहिता लागू होईल. निवडणूक आयोगाने ३९ राजकीय पक्षांना निवडणूक चिन्ह दिली आहेत.