घरमहाराष्ट्रElection Commission : एस.चोकलिंगम नवे मुख्य निवडणूक अधिकारी; देशपांडेंची तडकाफडकी बदली

Election Commission : एस.चोकलिंगम नवे मुख्य निवडणूक अधिकारी; देशपांडेंची तडकाफडकी बदली

Subscribe

अठराव्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा पुढील महिन्याच्या सुरुवातीला अपेक्षित आहे. त्यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून सध्या जोरदार तयारी आहे. ही तयारी सुरु असताना आज अचानक श्रीकांत देशपांडे यांना मुख्य निवडणूक अधिकारी पदावरून बाजूला करण्यात आले.

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांना बुधवारी (28 फेब्रुवारी) तडकाफडकी बदलण्यात आले. देशपांडे यांच्या जागी एस. चोकलिंगम यांची मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भारत निवडणूक आयोगाचे प्रधान सचिव राहुल शर्मा यांच्या सहीने यासंदर्भातील आदेश जारी करण्यात आले. देशपांडे हे येत्या 30 एप्रिलला सेवानिवृत्त होत आहेत. (Election Commission S Chokalingam new Chief Electoral Officer Hasty replacement of Deshpande)

अठराव्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा पुढील महिन्याच्या सुरुवातीला अपेक्षित आहे. त्यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून सध्या जोरदार तयारी आहे. ही तयारी सुरु असताना आज अचानक श्रीकांत देशपांडे यांना मुख्य निवडणूक अधिकारी पदावरून बाजूला करण्यात आले. राज्यातील लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या सनियंत्रणाखाली पार पडते. त्यामुळे या पदाची जबाबदारी सर्वात महत्वाची असते.

- Advertisement -

हेही वाचा : Loksabha Election 2024 : जरांगे पाटलांसाठी ‘वंचित’चा प्रस्ताव; जालन्यातून उमेदवारी देण्याची तयारी

- Advertisement -

श्रीकांत देशपांडे यांनी राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीची तयारी सुरु केली होती. मात्र, आज तडकाफडकी त्यांना पदावरून दूर करण्यात आले. त्यांच्या जागी मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्त झालेले एस. चोकलिंगम हे 1996 च्या तुकडीचे सनदी अधिकारी आहेत. एस.चौकलिंगम वरिष्ठ सनदी अधिकारी असून सध्या पुण्यातील यशदाचे महासंचालक म्हणून कार्यरत आहेत.

हेही वाचा : Ambadas Danve : कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे, सरकार अपयशी; दानवेंचे टीकास्त्र

आचारसंहितेचे संकेत

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यासह देशातील राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. यासोबतच लोकसभेची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू शकते. त्यामुळे संपूर्ण देशभर सध्या सर्वच राजकीय पक्षांची धावपळ सरू आहे. प्रशासकीय पातळीवरही मोठे फेरबदल होत आहेत. पोलीस अधिकाऱ्यांच्याही बदल्या केल्या जात आहेत. दरम्यान केंद्रीय निवडणूक आयोगाने आज महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारीपदी एस.चौकलिंगम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -