घरमहाराष्ट्रSanjay Raut : निवडणूक आयोग 'सुपारीबाज संस्था',राऊतांची घणाघाती टीका

Sanjay Raut : निवडणूक आयोग ‘सुपारीबाज संस्था’,राऊतांची घणाघाती टीका

Subscribe

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने लोकशाहीच्या पाठीत खंजीर खुपसला, त्यानंतर लोकशाहीची पूर्णपणे हत्या करण्यासाठी हे प्रकरण राहुल नार्वेकरांकडे सोपवण्यात आले आहे. निवडणूक आयोग सुपारीबाज संस्था असल्याची घणाघाती टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. निवडणूक आयोगाने काल मंगळवारी (ता. 06 फेब्रुवारी) राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवारांना दिले आहे. ज्यामुळे विरोधकांनी संताप व्यक्त केला आहे. प्रसार माध्यमांशी बोलताना संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपा, निवडणूक आयोग या सर्वांवर निशाणा साधला आहे. (Election Commission ‘Suparibaz Sanstha’, Sanjay Raut harsh criticism)

हेही वाचा… Sanjay Raut : “भ्रष्टाचार करा, पक्ष फोडा, हीच मोदी गॅरंटी…”, राऊतांचा भाजपावर हल्लाबोल

- Advertisement -

संजय राऊत म्हणाले की, अजित पवार किंवा एकनाथ शिंदे यांनी पक्षांतर केल्याबद्दल आमचे काही म्हणणे नाही. भाजपात त्यांनी शिरकाव केला हा त्यांचा प्रश्न आहे. पण त्यांनी पक्षावर दावा सांगायचा आणि भाजपाने ते पक्ष त्यांच्या हातात सोपवायचे हा वादाचा मुद्दा आहे. तुमच्यात हिंमत असेल तर स्वतःचा पक्ष स्थापन करा आणि लोकांसमोर जा. हा माझा पक्ष आहे मला मत द्या असे सांगा. चोऱ्यामाऱ्या करून, दरोडेखोरी करून तुम्हाला राजकारण करायचे असेल तर ते तात्पुरते आहे लक्षात ठेवा, असे राऊतांकडून सांगण्यात आले.

तसेच, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे अभिनंदन लोक करत आहेत त्यांना पक्ष मिळाला म्हणून. मात्र लक्षात घ्या तुमचाही पक्ष हातातून जाऊ शकतो. उद्या तुमच्याही हातून पक्ष जाऊ शकतो. भाजपाला या निर्णयाचे परिणाम भोगावे लागतील. शिवसेनेच्या बाबतीत जे झाले तेच राष्ट्रवादीच्या बाबतीत घडणार आहे. निवडणूक आयोगाने लोकशाहीच्या पाठीत खंजीर खुपसला, त्यानंतर लोकशाहीची पूर्णपणे हत्या करण्यासाठी हे प्रकरण राहुल नार्वेकरांकडे सोपवण्यात आले आहे. निवडणूक आयोग ही सुपारीबाज संस्था आहे. मोदी-शहांच्या सुपाऱ्या घेऊन राजकीय पक्षांमध्ये फूट पाडण्याचे काम आणि त्यांची हत्या करण्याचे काम निवडणूक आयोग करत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

- Advertisement -

शरद पवार खंबीर आहेत. लवकरच महाविकास आघाडीचे नेत्यांचे संयुक्त दौरे राज्यात होणार आहेत. तर या निकालानंतर काल शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची फोनवर सविस्तर चर्चा झाली. उद्धव ठाकरे यांनी त्यांचे अनुभव सविस्तर त्यांना सांगितले. या घटनेतील तांत्रिक बाजूंबाबतही दोघांनी चर्चा केली. आम्ही सगळे एकत्र ठामपणे उभे आहोत. या अन्यायाविरोधात लढण्याासाठी आम्ही तयार आहोत. लोकच आता या लोकांना धडा शिकवतील, असा विश्वास राऊतांनी व्यक्त केला.

यावेळी राऊतांनी राज्यसभेवर श्रीमंत शाहू छत्रपती यांना राज्यसभेवर बिनविरोध पाठवावे, असा विचार सुरू असल्याचे म्हटले आहे. याबाबत ते म्हणाले की, संभाजीराजे छत्रपती नॉट रीचेबाल आहेत हे मला माहीत नाही. आमची त्यांच्याशी चर्चा झाली नाही. पण आमचे मत आहे की, श्रीमंत शाहू छत्रपती यांना राज्यसभेवर बिनविरोध पाठवावे. आमच्याकडे एकूण 32 मते आमच्याकडे आहेत त्यामुळे त्यांना राज्यसभेवर पाठवावे अस मला वाटते, असे मत संजय राऊतांनी व्यक्त केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -