घरदेश-विदेशElection Commission : "देशात असं कधी घडलं नव्हतं...", शरद पवार यांचा टोला

Election Commission : “देशात असं कधी घडलं नव्हतं…”, शरद पवार यांचा टोला

Subscribe

छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वत:चे कर्तृत्व, कष्ट आणि राजमाता जिजाऊ यांचे मार्गदर्शन यामुळे हा इतिहास घडेला आहे, असे प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दिले.

पुणे : निवडणूक आयोगाचा निर्णय आश्चर्यकारक आहे. देशात कधी घडले नव्हते पण ते ही निवडणूक आयोगाने करून दाखविले, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी लगावला. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वत:चे कर्तृत्व, कष्ट आणि राजमाता जिजाऊ यांच्या मार्गदर्शन यामुळे हा इतिहास घडला आहे, असे प्रत्युत्तर शरद पवार यांनी उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्यावर दिले आहे.

पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतर निवडणूक आयोग काय चिन्ह देईल? या प्रश्ना विचारल्यावर शरद पवार म्हणाले, “माझा वैयक्तिक अनुभव असा आहे, मी आतापर्यंत पहिली निवडणूक लढलो, ही दोन बैलजोडीवर लढलो, नंतर आमचे चिन्ह गेलेले, मग आम्ही चरख्यावर लढलो, हेही चिन्ह गेले. यानंतर आम्ही हातावर निवडणूक लढलो. ते गेल्यानंतर घड्यावर निवडणूक लोढलो. यामुळे चिन्ह हे मर्यादीत काळासाठी उपयुक्त असते. पण या पद्धतीने निवडणूक आयोगाचा निकाल आश्चर्यकारक आहे. निवडणूक आयोगाने आमचे पक्ष आणि चिन्ह काढून घेतले तर आमचा पक्षच दुसऱ्याला दिला. ज्यांनी पक्ष स्थापन आणि उभारणी केली, त्यांच्याकडून काढून घेऊन दुसऱ्याच्या हातात दिले. यापूर्वी देशात कधी घडले नव्हते पण ते ही निवडणूक आयोगाने करून दाखविले. लोक या गोष्टी समर्थन देणार नाही. आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलो आहोत. यावर लवकरच न्याय मिळेल, अशी आमची अपेक्षा आहे.”

- Advertisement -

हेही वाचा –Sharad Pawar On Fadnavis : कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी असणाऱ्यांनी दुर्लक्ष करू नये – शरद पवार

मला भावनिक बोलण्याची काही गरज नाही

काही नेते येतील आणि सांगितल की, शेवटची निवडणूक असल्याचे काही नेते आव्हान करतील, असे अजित पवार हे बारामतीत म्हणाले. अजित पवारांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणाले, “चांगली गोष्टी आहे, मी काय निवडणुकीला उभा राहणार नाही. मी हे यापूर्वीच जाहीर केले आहे, त्यामुळे भावनिक बोलण्याचे काही गरज नाही. बारामतीचे लोक हे समजूतदार आहेत. बारामतीकारांची कोणी आणि प्रतिष्ठा वाढवलेले आहे. हे त्यांना माहिती आहे, त्यामुळे ते योग्य निर्णय घेतली.”

- Advertisement -

हेही वाचा – Ajit Pawar : आधी संघटना मजबूत करू, नंतर मुख्यमंत्रीपदाचं पाहू- अजित पवार

 राजमाता जिजाऊ यांच्या मार्गदर्शने इतिहास घडला

रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांना मार्गदर्शन केले, असे उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले. या वक्तव्यावर शरद पवार म्हणाले, “आमच्या दृष्टीने छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व याच्या पाठीमागे राजमाता जिजाबाई याचे मोठे योगदान आहे. व्यक्तिमत्व घडवणे, दिशा देणे, हे सर्व काम राजमाता जिजाऊ यांनी केली आहे. राजमाता जिजाऊचे कर्तृत्व हे बाजूला सारून त्यांच्याशिवाय आणखी कोणाला तरी द्याचे. ही भूमिका काही लोक घेत आहेत. पण सगळ्या जगाला माहिती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वत:चे कर्तृत्व, कष्ट आणि राजमाता जिजाऊ यांचे मार्गदर्शन यामुळे हा इतिहास घडेला आहे,” असेही शरद पवार म्हणाले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -