घरताज्या घडामोडीआगामी निवडणुकांमध्ये मतदान करण्यासाठी नाव नोंदणी करा, राज्य निवडणूक आयुक्तांचे आवाहन

आगामी निवडणुकांमध्ये मतदान करण्यासाठी नाव नोंदणी करा, राज्य निवडणूक आयुक्तांचे आवाहन

Subscribe

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कोणीही मतदानापासून किंवा उमेदवारीपासून वंचित राहू नये, यासाठी ज्या मतदारांनी आपली नाव नोंदणी केली नाही. त्यांना त्वरित नाव नोंदणी करावी असे आवाहन राज्य निवडणूक आयुक्त यु. पी. एस. मदान यांनी केलं आहे. भारत निवडणूक आयोगातर्फे १ ते ३० नोव्हेंबर २०२१ या कालावधीत विशेष कार्याक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमात विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाच्या निमित्ताने अधिकाधिक पात्र नागरिकांनी मतदार म्हणून नावे नोंदवावित किंवा आवश्यक त्या दुरूस्त्या कराव्यात, असे आवाहन राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी केले.

आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी सांगितले की, भारत निवडणूक आयोगातर्फे तयार करण्यात येणारी विधानसभा मतदार संघांच्याच मतदार याद्या महानगरपालिका, नगरपरिषदा/ नगरपंचायती, जिल्हा परिषदा/ पंचायत समित्या व ग्रामपंचायती या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जशाच्या तशा वापरल्या जातात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ही मतदार यादी प्रभागनिहाय विभाजित करताना नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे अथवा नावांत किंवा पत्त्यांमध्ये दुरूस्ती करणे इत्यादी स्वरूपाची कुठलीच कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही. त्यामुळे विधानसभेच्या मतदार यादीत नाव नसल्यास नावांची नोंदणी करणे, दुबार नावे वगळणे किंवा नावांतील अथवा पत्यांमधील दुरूस्त्या करण्यासाठी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण ही एक चांगली संधी आहे.

- Advertisement -

मतदार नोंदणी ही निरंतर चालणारी प्रक्रिया असली तरी १ नोव्हेंबरपासून ते ३० नोव्हेंबर २०२१ पर्यंत ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्यासाठी १ जानेवारी २०२२ हा अर्हता दिनांक आहे. म्हणजे 1 जानेवारी 2022 रोजी 18 वर्षे पूर्ण करणारी व्यक्ती आता मतदार म्हणून आपले नाव नोंदवू शकते. मतदार नोंदणीसाठी फक्त निवासाचा आणि वयाचा दाखला; तसेच स्वत:चे छायाचित्र आवश्यक असते. राज्यात राज्य निवडणूक आयोग, मुख्य निवडणूक अधिकारी, जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्त यांच्या सहकार्यातून व समन्वयाद्वारे व्यापक प्रमाणावर मदतार नोंदणी मोहीम राबविली जात आहे, अशी माहितीही आयुक्त मदान यांनी दिली.


हेही वाचा : बॉम्ब फोडा, पण धूर येऊ देऊ नका, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -