निवडणूक आयोगाचा निकाल आधीच होता तयार; पोटनिवडणुकीचा उल्लेख कसा

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या ७८ पानी निकालपत्रात चिंचवड व कसबा पेठ पोटनिवडणुकीचा मुद्दा स्पष्टपणे नमूद करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव व मशाल हे चिन्ह वापरण्याचे अंतरिम आदेश १० ऑक्टोबर २०२२ रोजी दिले आहेत. हे आदेश चिंचवड व कसबा पेठ पोटनिवडणुकीपर्यंतच लागू राहतील. या पोटनिवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे व मशाल चिन्ह ठाकरे गट वापरू शकतो, असे आयोगाने आदेशात नमूद केले आहे. 

 

मुंबईः चिंचवड व कसबा पेठ पोटनिवडणुकीपर्यंतच उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव व मशाल हे चिन्ह ठाकरे गटाला वापरता येईल, असे केंद्रीय निवडणूक आयोगाने निकालात नमूद केले आहे. या निवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवाराला संधी देण्यात आलेली नाही. चिंचवडमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नाना काटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर कसबा पेठ मतदारसंघातून काँग्रेसचे रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे ठाकरे गटाला नाव व चिन्ह वापरण्याची मुभा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. परिणामी निवडणूक आयोगाचा हा निकाल आधीच तयार होता हेच यातून स्पष्ट होते.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या ७८ पानी निकालपत्रात चिंचवड व कसबा पेठ पोटनिवडणुकीचा मुद्दा स्पष्टपणे नमूद करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव व मशाल हे चिन्ह वापरण्याचे अंतरिम आदेश १० ऑक्टोबर २०२२ रोजी दिले आहेत. हे आदेश चिंचवड व कसबा पेठ पोटनिवडणुकीपर्यंतच लागू राहतील. या पोटनिवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे व मशाल चिन्ह ठाकरे गट वापरू शकतो, असे आयोगाने आदेशात नमूद केले आहे.

१८ जानेवारी २०२३ रोजी चिंचवड व कसबा पेठ पोटनिवडणूक जाहिर झाली. या निवडणूकीसाठीची अधिसूचना ३१ जानेवारी रोजी जारी करण्यात आली. ७ फेब्रुवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असणार होती. ८ फेब्रुवारी अर्जांची छाननी तर १० फेब्रुवारी पर्यंत अर्ज परत घेता येणार होता. या दोन्ही पोटनिवडणुकांसाठी मतदान २७ फेब्रुवारी रोजी होणार आहे आणि या निवडणूकीचा निकाल २ मार्च रोजी जाहीर होईल. पिंपरी चिंचवड शहरातील भाजपाचे जेष्ठ आमदार लक्ष्मण पांडुरंग जगताप यांचे ३ जानेवारी २०२२ रोजीदीर्घ आजाराने बाणेर येथील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये निधन झाले. तर भाजपाच्या आमदार आणि पुण्याच्या माजी महापौर मुक्ता टिळक यांचे २२ डिसेंबर २०२२ रोजी दिर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या जागी ही पोटनिवडणूक होत आहे.

पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीचाच उमेदवार असेल असे जाहिर करण्यात आले होते. त्यानुसार उमेदवार जाहिर झाला. एवढचं काय तर राष्ट्रवादी कॉंग्रेसला फटका बसू नये म्हणून राहुल कलाटे यांची मनधरणी करण्यासाठी ठाकरे गटाने प्रयत्न केले. ठाकरे गट निवडणुकीच्या रिंगणातच उतरलेला नाही हे स्पष्ट असताना केंद्रीय निवडणूक आयोगाला निकाल देताना नाव व चिन्हाची सूचना करण्याची काहीच आवश्यकता नव्हती. कारण या पोटनिवडणकीची उमेदवारी अर्ज भरण्याची व अर्ज मागे घेण्याची मुदत कधीच संपली आहे. परिणामी हा निकाल पोटनिवडणूक जाहीर होण्याआधीच तयार होता. केवळ औपचारिकता म्हणून दोन्ही गटाचे म्हणणे आयोगाने ऐकून घेतले व सोयीनुसार निकाल जाहिर केला असेच यातून स्पष्ट होत आहे.