काँग्रेस अध्यक्षपदासाठी आज सहाव्यांदा निवडणूक; घराण्याबाहेरील उमेदवारांमध्ये लढत

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाची निवडणूक सोमवारी 17 ऑक्टोबर रोजी होणार आहे. या निवडणुकीची पूर्व तयारी पूर्ण झाली असून, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्यालय असलेल्या टिळक भवनयेथे सकाळी दहा ते दुपारी चार या वेळेत मतदान होणार आहे.

congress president election

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाची निवडणूक सोमवारी म्हणजे आज (17 ऑक्टोबर) रोजी होणार आहे. या निवडणुकीची पूर्व तयारी पूर्ण झाली असून, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्यालय असलेल्या टिळक भवनयेथे सकाळी दहा ते दुपारी चार या वेळेत मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी दोन्ही उमेदवारांकडून जोरदार तयारी केली जात आहे. विशेष म्हणजे 24 वर्षांनंतर पहिल्यांदाच गांधी घराण्याबाहेरील व्यक्ती काँग्रेसचा अध्यक्ष होणार आहे. त्यामुळे कॉंग्रेसचा नवा अध्यक्ष कोण होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (Election for Congress President on Monday Fighting between candidates outside the family)

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर यांची निवडणुकीची तयारी ही अंतिम टप्यात आली आहे. आज पक्षाध्यक्षपदासाठी मतदान होणार असून बुधवारी मतमोजणी होणार आहे. कॉंग्रेस पक्षाच्या जवळपास 137 वर्षांच्या इतिहासात सहाव्यांदा अशी, निवडणूक लढवली जाणार आहे. या निवडणुकीत सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यापैकी एकही गांधी घराण्यातील उमेदवार यामध्ये सहभागी झाला नाही.

दरम्यान, काँग्रेसच्या 137 वर्षांच्या इतिहासात अध्यक्षपदासाठी ही सहाव्यांदा अंतर्गत निवडणुका होणार आहे. सर्वप्रथम 1950 मध्ये स्वातंत्र्यानंतर काँग्रेसमध्ये अध्यक्षपदाची निवडणूक झाली होती. त्यावेळी पुरुषोत्तम दास टंडन आणि आचार्य कृपलानी यांच्यात लढत झाली. या निवडणुकीत पुरुषोत्तम दास टंडन हे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा जिंकली होती.

1977 मध्ये देवकांत बरुआ यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली. त्यामध्ये के. ब्रह्मानंद रेड्डी यांनी सिद्धार्थ शंकर रे आणि करण सिंग यांचा पराभव केला होता.

1997 मध्ये पक्षाध्यक्षपदासाठी निवडणूक झाली होती. मात्र त्यानंतर सीताराम केसरी, शरद पवार आणि राजेश पायलट यांच्यात तिरंगी लढत झाली होती. केसरीला महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशचा काही भाग वगळता काँग्रेसच्या सर्व राज्यातील नेत्यांनी पाठिंबा दिला होता. त्यामुळ त्यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला होता.

2000 मध्ये जितेंद्र प्रसाद आणि सोनिया गांधी यांच्यामध्ये लढत झाली होती. त्यावेळी सोनिया गांधींना त्यांचा पराभव केला होता.

 • इंदिरा गांधी 1959 मध्ये काँग्रेसच्या अध्यक्षा झाल्या होत्या.
 • एन.एस रेड्डी यांनी 1963 पर्यंत पक्षध्याक्ष म्हणू ही जबाबदारी सांभाळली होती.
 • कामराज हे 1964-67 पर्यंत काँग्रेसचे अध्यक्ष होते.
 • एस निजलिंगप्पा 1968-69 पर्यंत काँग्रेसचे अध्यक्ष होते
 • जगजीवन राम हे 1970-71 पर्यंत काँग्रेसचे अध्यक्ष झाले होते.
 • डॉ. शंकरदयाल शर्मा 1972-74 पर्यंत काँग्रेसचे पक्षाचे अध्यक्ष होते.
 • देवकांत बरुआ 1975-77 पर्यंत काँग्रेसचे पक्षाचे अध्यक्ष होते.
 • के. ब्रह्मानंद रेड्, 1977-78 पर्यंत काँग्रेसचे पक्षाचे अध्यक्ष होते.
 • इंदिरा गांधी 1978-84 पर्यंत काँग्रेसचे पक्षाचे अध्यक्ष होते.
 • राजीव गांधी 1985 ते 1991 पर्यंत काँग्रेसचे अध्यक्ष होते.
 • पी. व्ही. नरसिंह राव 1992-96 पर्यंत काँग्रेसचे अध्यक्ष होते.
 • सोनिया गांधी पक्षाच्या अध्यक्षा बनल्या.
 • राहुल गांधी 2017 मध्ये अध्यक्ष झाले.
 • यानंतर राहुल गांधी यांनी 2019 मध्ये राजीनामा दिला आणि सोनिया गांधींना पुन्हा पक्षाच्या अध्यक्ष पदी बसवले.

हेही वाचा – काँग्रेस अध्यक्षपदासाठी उद्या निवडणूक, राज्यभरतील 561 मतदार बजावणार मतदानाचा हक्क