घर ठाणे एपीएमसी बाजार सभापती आणि उपसभापतींची निवडणूक स्थगित

एपीएमसी बाजार सभापती आणि उपसभापतींची निवडणूक स्थगित

Subscribe

नवी मुंबई – मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती पदासाठी उद्या १२ जानेवारी रोजी निवडणूक प्रक्रिया होणार होती. मात्र संचालक मंडळाच्या पात्रतेची निर्णय न झाल्याने सभापती व उपसभापती पदाची निवडणूक प्रक्रिया शासन निर्णय होईपर्यंत स्थगित करण्यात आली आहे, याबाबतचे परिपत्रक मुंबई एपीएमसी बाजार समितीचे सचिव राजेश भुसारी यांनी सर्व संचालक मंडळाला दिले आहे. बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती निवड प्रक्रिया 24 तासावर असताना रद्द करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

राज्यातील त्या त्या विभागातील एपीएमसी संचालकांचे तेथील पद रद्द झाल्याने संचालक म्हणून अपात्र ठरले आहेत. मुंबई एपीएमसीसह सहा विभागातून निवडून आलेल्या १८ संचालकांपैकी ७ संचालकांचे पद रद्द झाले होते. यामध्ये माधवराव जाधव (बुलडाणा), धनंजय वाडकर (भोर, पुणे), बाळासाहेब सोळसकर (कोरेगाव, सातारा), वैजनाथ शिंदे (लातूर), प्रभू पाटील (उल्हासनगर ठाणे), जयदत्त होळकर (निफाड नाशिक), अद्वय हिरे (नाशिक) यांचा समावेश आहे. ७ पद रद्द झाले होते तसेच सभापती अशोक डकसह तीन जणांना सहा महिने मुदतवाढ देण्यात आली होती.

- Advertisement -

यादरम्यान मे महिन्यात आघाडी सरकारने संचालक पद रद्द केलेल्या निर्णयाला पणन मंत्री तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढील सुनावणी होईपर्यंत स्थगिती दिली होती. तर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील सभापती अशोक आणि उपसभापती धनंजय वाडकर यांनी २१ डिसेंबर २०२२ रोजी आपल्या पदाचा राजीनामा पणन संचालकांकडे दिला होता. त्यांचा राजीनामा संचालक मंडळाने मंजूर केला होता.

मुख्यमंत्री व पणन मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुनावणी झाली आहे. बाजार समितीमध्ये सांचालक मंडळ टिकवण्यासाठी १२ सदस्याचा कोरम आहे. मात्र आता ५ संचालक पात्रता आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या सदस्यांच्या पात्रतेबाबत निर्णय प्रलंबित असल्याने उद्या १२ जानेवारी २०२३ रोजी। आयोजित करण्यात आलेली मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सदस्यांमधून सभापती व उपसभापती यांच्या निवडणुकीची प्रक्रिया शासन निर्णय होईपर्यंत स्थगित करण्याचे परिपत्र बाजार समितीच्या सचिव विभागाने काढल्याने ही निवडणूक पुन्हा कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाजार समितीच्या बाबतीत येणाऱ्या कालावधीत काय निर्णय घेणार हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे. आपल्या संचालक पद टिकवण्यासाठी बाजार समितीचे सदस्य एकत्र आल्याचे समजते. दुसरीकडे राष्ट्रवादी आणि कांग्रेसकडे बहुमत असताना सभापती पदासाठी जोरदार संघर्ष सुरु आहे.


- Advertisement -

हेही वाचा : बच्चू कडू यांच्या अपघाताबाबत मला संशय, राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरींचं मोठं वक्तव्य


 

- Advertisment -