खालापूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीपदी संतोष जंगम यांची निवड

कृषी उत्पन्न बाजार समिती खालापूरच्या सभापती आणि उपासभापतींच्या पदाकरिता पार पडलेल्या निवडणुकीत सभापती पदावर संतोष जंगम तर उपसभापती पदावर जयवंत पाटील यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी सुनील कुलकर्णी यांनी काम पाहिले.

खालापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या 17 पदांसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत शेकापने 15 जागांवर बिनविरोध विजय मिळवला असल्याने सभापती आणि उपासभापती पदावर शेकापचे उमेदवार विजयी होणार, हे जवळपास निश्चित असल्याने आज पार पडलेल्या कार्यक्रमप्रसंगी शेकापचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विजयाची घोषणा होताच शेकाप कार्यकर्त्यांनी फटाके फोडत विजयी मिरवणूकीने आपला आनंद व्यक्त केला. या प्रसंगी शेकाप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.


हेही वाचा : काँग्रेसमधून हकालपट्टी झाल्यानंतर आशिष देशमुखांनी थोपटले काकांविरोधात