Maharashtra Assembly Election 2024
घरक्राइमनिवडणूक अधिकार्‍यांचा हॉटेलमध्ये छापा; बॅगेत सापडली कोट्यवधींची रोकड

निवडणूक अधिकार्‍यांचा हॉटेलमध्ये छापा; बॅगेत सापडली कोट्यवधींची रोकड

Subscribe

विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असतानाच निवडणूक अधिकार्‍यांनी सोमवारी (दि.१८) सकाळी नाशिक शहरातील एका नामांकित हॉटेलमध्ये छापा टाकला. या छाप्यात अधिकार्‍यांनी कोट्यवधी रुपये घबाड सापडले आहे. या कारवाईत एका राजकीय पक्षाच्या नेत्याची गाडी जप्त करण्यात आल्याचे समजतेे. निवडणुकीच्या प्रचाराच्या अखेरच्या दिवशी इतकी मोठी रक्कम आढळल्याने नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे. (Election officials raid hotels; Crores worth of cash was found in the bag)

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचारचा आज अखेरचा दिवस असल्याने निवडणूक आयोगाचे पथक अधिक सक्रीय झाले आहे. उत्तर महाराष्ट्रात अवैध मद्यसाठा, रोकडसह ४९ कोटीहून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नाशिक शहरात काही दिवसांपूर्वी सातपूरमध्ये एका बंद वाहनात २० लाख, उपनगरमध्ये एका मजुराच्या घरात ११ लाख व नाशिक तालुका पोलिसांनी दुगावमध्ये ३३ लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. या घटना समोर आल्या असतानाच नाशिक शहरातील एका नामांकित हॉटेलमध्ये सोमवारी (दि.१८) सकाळी निवडणूक आयोगाच्या पथकाने छापा टाकला. या छाप्यात कोट्यवधीची रक्कम जप्त करण्यात आले आहेत. पाच कोटीहून अधिक रक्कम असल्याची माहिती मिळत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -