Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रEVM Vs Ballot paper : बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या... आज राजीनामा देतो;...

EVM Vs Ballot paper : बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या… आज राजीनामा देतो; जितेंद्र आव्हाडांचे भाजपला आव्हान

Subscribe

मुंबई – महाराष्ट्र विधानसभेचा निकाल कोणालाही पचणी पडत नाही. महायुतीची कोणतीही लाट नसताना त्यांना २३० हून अधिक जागा मिळाल्या आहेत. यामुळे विरोधकांनी या निकालाचे विश्लेषण करण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेस नेते नाना पटोले आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ईलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र आणि निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेवर आरोप केले आहेत. शेवटच्या एक तासात मतदानाची टक्केवारी कशी वाढली असा सवाल दोन्ही नेत्यांनी केला. यावर भारतीय जनता पक्षाने प्रत्युत्तर देत ज्यांना ईव्हीएमवर शंका असेल त्यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा असे आव्हान दिले. यावर जितेंद्र आव्हाडांनी सडेतोड उत्तर दिले आहे. जितेंद्र आव्हाड यांनी आज काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

विरोधकांना ईव्हीएमवर शंका 

राज्यात 132 जागांवर विजय मिळवत भाजपा महायुतीतील सर्वात मोठा पक्ष बनला आहे. तर महायुतीने 288 पैकी 230 जागांवर विजय मिळवला आहे. याउलट महाविकास आघाडीला केवळ 46 जागांवर विजय मिळवता आला आहे. पण या निवडणुकीत मोठाच घोळ घालण्यात आला असल्याची शंका विरोधकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisement -

भाजप पराभूत उमेदवाराचाही ईव्हीएमवर संशय 

महायुतीला मिळालेल्या बहुमतावर काँग्रेसने शंका उपस्थित केली आहे. त्यासोबतच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पुण्यात झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ईव्हीएममधील गडबडीचे पुरावे शोधण्यास सांगितले आहे. एकीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून ‘ईव्हीएम’बाबत शंका उपस्थित होत आहे. तर, भाजप उमेदवार राम शिंदे यांनी देखील ईव्हीएमवर शंका उपस्थित केली. त्यांनी 17 मतदान केंद्रावरील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट पडताळणीसाठी अर्ज दाखल केला आहे. यासाठी राम शिंदे यांनी 8 लाख 2 हजार 400 रूपये भरले आहेत.

बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या… 

राष्ट्र्वादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ईव्हीएमविरोधात भूमिका घेतली आहे. जितेंद्र आव्हाडांच्या टीकेनंतर माजी खासदार आनंद परांजपेंनी त्यांना आव्हान दिले आहे. “जितेंद्र आव्हाड यांना माझं खुलं आव्हान आहे. त्यांना जर वाटत असेल ईव्हीएम मशीन हॅक होते. त्यांनी त्यांचा आमदारकीचा राजीनामा द्यावा. आपण बॅलेट पेपरवर सर्वात पहिली महाराष्ट्रातली निवडणूक ही मुंब्रा-कळवा विधानसभेत घेऊया, म्हणजे दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल”, असे आव्हान दिले आहे. तर भाजप नेते सुधीर मुनगंटीवरा यांनी ईव्हीएमवर शंका घेणाऱ्यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा असे आव्हान दिले.

- Advertisement -

काळजीवाहू मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेऊन आल्यानंतर पत्रकारांनी मुनगंटीवाराच्या आव्हानाविषयी विचारले असता आव्हाड म्हणाले की, त्यांनी आज जाहीर करावे की बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या जातील मी त्यांच्याकडे राजीनामा पाठवून देतो. बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याचे धाडस त्यांनी दाखवावे. बॅलेट पेपरवर निवडणुका होणार असे परिपत्रक त्यांनी दाखवावे, जितेंद्र आव्हाड आज राजीनामा त्यांच्या हातात देतो, असे प्रतिआव्हान आता आव्हाडांनी भाजपला दिले आहे.

हेही वाचा : Mahayuti : बहिणींना फक्त 1500, लाडक्या भावाच्या हातात तिजोरी; मुख्यमंत्रीपदासाठी एकही सक्षम महिला नाही का?

Edited by – Unmesh Khandale

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -