घरमहाराष्ट्रElection Results 2023 : देशात तुम्हाला विचारतंय कोण? आशिष शेलारांचा ठाकरे गटाला...

Election Results 2023 : देशात तुम्हाला विचारतंय कोण? आशिष शेलारांचा ठाकरे गटाला टोला

Subscribe

मुंबई : देशातील चार राज्यांत झालेल्या निवडणुकांची मतमोजणी सुरू आहे. मात्र, एकूण कल पाहता तेलंगणावगळता मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपाची सत्ता येणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. याबाबत मुंबई भाजपाचे अध्यक्ष आमदार Adv. आशिष शेलार यांनी आनंद व्यक्त करतानाच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

हेही वाचा – Telangana Result : ‘क्या से क्या हो गया?’ महाराष्ट्रात पक्ष वाढीच्या नादात KCR ने गमावला तेलंगणा

- Advertisement -

मध्य प्रदेशातील 230पैकी 160 जागा भाजपाने मुसंडी मारली असून काँग्रेस 68 जागांवर आघाडीवर आहे. राजस्थानच्या 199 जागांपैकी 114 जागा भाजपा तर, काँग्रेस 70 जागांवर आघाडीवर आहे. छत्तीसगडमधील 90पैकी 54 जागांवर भाजपाने आघाडी घेतली असून काँग्रेस 33 जागांवर पुढे आहे. केवळ तेलंगणात 119 जागांपैकी 64 जागांवर पुढे असून भारत राष्ट्र समिती (बीआरएस) 40 जागांवर पुढे आहे. भाजपाच्या या यशाबद्दल आमदार आशिष शेलार यांनी आनंद व्यक्त केला आहे.

- Advertisement -

आज कळले का, मर्द कोण आणि मर्दानकी काय असते ती? आज देशाने काँग्रेसच्या युवराजांना देखील दाखवून दिले आहे की, ‘पनौती’ कोण आणि ‘चुनौती’ कोण! महाराष्ट्रातील पंचायत ते राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगडच्या विधानसभा आणि लवकरच होणाऱ्या पार्लमेंटमध्ये फक्त मोदी मोदी आणि मोदी, अशा शब्दांत आशिष शेलार यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा समाचार घेतला आहे.

हेही वाचा – CM Of MP : शिवराजसिंह चौहान यांच्यासोबतच ‘हे’ नेतेसुद्धा CM पदाचे उमेदवार; माळ नेमकी कुणाच्या गळात?

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे युगपुरुष की विश्वपुरुष आहेत, असे प्रमाणपत्र उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी मुंबईत येऊन दिले, पण या देशाला फक्त एका पुरुष नेतृत्वाची गरज आहे, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. त्याला प्रत्युत्तर देताना आमदार शेलार म्हणाले की, महाराष्ट्राच्या गल्लीत उभे राहून रोज एक नेता सांगत असतो, “होय मी मर्द आहे..!” त्यांचे बिनकामाचे सरदार पत्रकार पोपटलाल म्हणतात, “देशाला पुरुष हवाय!” अरे तुम्हाला मीडियाचे चार कॅमेरे सोडले तर या देशात विचारते कोण? अशी उपहासात्मक टीकाही त्यांनी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -