घरमहाराष्ट्रElection Results : दक्षिणेतून भाजपा तर उत्तरेतून काँग्रेसचा सुपडा साफ; महाराष्ट्रात कशी...

Election Results : दक्षिणेतून भाजपा तर उत्तरेतून काँग्रेसचा सुपडा साफ; महाराष्ट्रात कशी असेल स्थिती?

Subscribe

मुंबई : मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणामध्ये झालेल्या चार विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सुरू आहे. आतापर्यंतचे निकाल पाहिले तर मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपने विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये सत्तांतर करत भाजपाने सत्ता मिळवली आहे. तर मध्य प्रदेशात सत्ता कायम ठेवली आहे. तर दुसरीकडे तेलंगणा निवडणुकीत काँग्रेसने मोठा विजय मिळविल्यामुळे दक्षिणतून भाजपाचा सुपडा साफ झाला आहे. (Election Results BJP lost from South and Congress from North How will the situation be in Maharashtra)

तेलंगणात भाजपाचीच सत्ता येईल, असा दावा भाजपा नेते सातत्याने करत होते. मात्र या दाव्यांखेरीज भाजपा दूरदूरपर्यंत दिसून आली नाही. तेलंगणात काँग्रेस चांगल्या फरकाने आघाडीवर आहे. त्याचवेळी 2014 मध्ये राज्याच्या स्थापनेपासून सत्तेत असलेली भारत राष्ट्र समिती (BRS) दुसऱ्या क्रमांकावर आहे. तेलंगणात काँग्रेसच्या कर्नाटक फॅक्टरने काम केले, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

- Advertisement -

हेही वाचा – Assembly Election Result 2023 : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राहुल गांधी यांची पहिली प्रतिक्रिया

गेल्या काही काळापासून उत्तर भारतामध्ये केरळ, तमिळनाडू, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये भाजपकडून बस्तान बसवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा होतना दिसत आहे. मात्र, काँग्रेसने आधी कर्नाटक आणि आता तेलंगणा राज्यात भाजपाचा डाव धुळीस मिळवला आहे. या दोन्ही राज्यात काँग्रेसने सत्ता मिळवताना दक्षिणेकडील स्थान अधोरेखित केलं आहे. त्याचवेळी भाजपाने मध्य प्रदेशात सत्ता कायम ठेवत, राजस्थान आणि छत्तीगडमध्ये सत्तांतर करत सत्ता मिळवली आहे. त्यामुळे उत्तर भारतातून काँग्रेस हद्दपार अन् दक्षिणेतून भाजप हद्दपार झाली आहे.

- Advertisement -

2019 च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर भारतातील 184 पैकी 141 जागा एकट्या भाजपच्या वाट्याला गेल्या. गुजरातमधील 26 पैकी 26, दिल्लीतील 7 पैकी 7, हिमाचलमधील 4 पैकी 4 आणि महाराष्ट्रातील 48 पैकी 23 जागा जोडल्यास भाजपला 201 जागा मिळाल्या होत्या. उत्तर भारतात एकट्या उत्तर प्रदेशात लोकसभेच्या 80 जागा आहेत. याशिवाय बिहार (40), मध्य प्रदेश (29), राजस्थान (25) आणि हरियाणा (10) या राज्यांचा विचार केल्यास लोकसभेच्या जागांची संख्या 184 वर पोहोचते. 184 चा हा आकडा सार्वत्रिक निवडणुकीत बहुमताचा आकडा गाठण्यासाठी आवश्यक असलेल्या 273 जागांपेक्षा मोठा आहे. सध्याच्या पाच राज्यांच्या निवडणुकीत मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी हे स्पष्ट केले आहे की, जनमत अजूनही पंतप्रधान मोदींच्या बाजूने आहे. चारपैकी तीन राज्यातील विजयाने भाजपाला 82 जागांवर आत्मविश्वास आला असला, तरी महाराष्ट्रात भाजपसमोर तगडं आव्हान असणार आहे.

हेही वाचा – Narendra Modi : ‘सबका साथ, सबका विकास’ या भावनेचा आज विजय; मोदींकडून विश्वास व्यक्त

भाजपाला महाराष्ट्रात 2024 ची शाश्वती नाही

आज भाजप महाराष्ट्रात सत्तेत असला, तरी त्यांना एकनाथ शिंदे आणि अजित पवार गटाची मर्जी सांभाळावी लागत आहे. एकनाथ शिंदेंनंतर अजित पवार यांनीही बंडखोरी केल्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी, असा थेट लढत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे भाजपा महाराष्ट्रात 2019 ची पुनरावृत्ती लोकसभा आणि विधानसभेला करू शकेल की नाही, याबाबत कोणतीही श्वाश्वती नाही. महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यापासून 27 महानगरपालिका, 230 नगरपालिका, 26 जिल्हा परिषदा आणि 284 पंचायत समित्यांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत. पुढील दोनच महिन्यात लांबणीवर असलेल्या महानगरपालिकांच्या निवडणुकांना चार वर्ष पूर्ण होतील. त्यामुळे महाराष्ट्रात भाजपाची सत्ता येणार का? हे पाहावे लागेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -