मुंबई : देशातील पाच राज्यांपैकी तीन राज्यात भाजपाला बहुमत मिळाले आहे. छत्तीसगडमधील पराभवाचे काँग्रेसने आत्मचिंतन करण्याची गरज आहे. तर मध्य प्रदेशमध्ये इंडिया आघाडीमधून निवडणूक लढलो असतो तर चित्र वेळले असते. असे सूचक विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी चार राज्याच्या निकालानंतर दिली आहे. मध्य प्रदेशच्या पराभवासाठी कमलनाथ आणि दिग्विजय सिंग जबादार असल्याची टीका संजय राऊत यांनी केले आहे. तसेच मोदी-शहांचे अभिनंदन करताना केंद्रीय तपास यंत्रणांचे देखील अभिनंदन केले पाहिजे, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे.
मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसच्या पराभवावर संजय राऊत म्हणाले, “मध्य प्रदेशमधील काँग्रेसचा पराभव हा कमलनाथ आणि दिग्विंजय सिंग याच्यामुळे पराभव आहे. कारण राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी केलेली मेहनत ही नाकारता येणार नाही. काँग्रेसला मध्य प्रदेशमध्ये प्रतिसाद उत्तम होता. अनेक राज्यात काँग्रेसचे जे प्रमुख नेते आहेत. लोकांनी त्यांना नाकारले आहे, असे मला वाटते, अशी टीका संजय राऊतांनी केली आहे.
संजय राऊत म्हणाले, “मध्य प्रदेशात इंडिया म्हणून निवडणुका लढल्या असत्या. काँग्रेसने इंडिया आघाडीच्या उमेदवारांना सहकार्य केले असते तर तर काँग्रेसची कामगिरी यापेक्षा चांगली झाली असती, असे माझे स्पष्ट मत आहे. मध्य प्रदेशमध्ये अखिलेश यादव यांच्या पक्षाला काही भागात चांगले स्थान आहे आणि त्यांची इच्छा होती की, काँग्रेससोबत युती करून किमान 10 ते 12 जागा एकत्र लढाव्यात पण कमलनाथ यांनी ही युती होऊ दिली नाही. याचा फटका काँग्रेसला काही ठिकाणी बसला आहे. हे स्वीकारायला पाहिजे”, अशी टीका संजय राऊतांनी कामलनाथ आणि दिग्विजय सिंग यांच्यावर केली आहे.
हेही वाचा – Election Results : लोकसभेच्या 45 पेक्षा जास्त तर, विधानसभेच्या सव्वादोनशे जागा जिंकणार; बावनकुळेंना विश्वास
इंडिया म्हणून निडवणुका लढवायला पाहिजे
इंडिया आघाडीसंदर्भात बोलताना संजय राऊत म्हणाले, “तीन राज्याच्या पराभवानतून एक धडा घेईला पाहिजे की, इंडिया आघाडी म्हणून आपण निवडणुका लढवायला हव्यात. मग त्या निवडणुका राज्याच्या असो किंवा राष्ट्रीय स्थरावतील असतील. एक टीम वर्क होणे गरजेचे आहे. राज्यातील प्रादेशिक पक्षांना डावलून राजकारण करता येणार नाही. भाजपचा जल्लोष सुरू आहे. ‘जो जीता वही सिकंदर’ असे आपण म्हणतो. लोकशाहीत जनमताचा कौल हा मान्य करायचा असतो.”
हेही वाचा – Sanjay Raut : भाजपच्या राज्यात तेवढेच स्वस्त आहे…, खासदार संजय राऊतांची बोचरी टीका
मोदी-शहांच्या बरोबर केंद्रीय तपास यंत्रणांचे अभिनंदन
भाजपाच्या विजयावर संजय राऊत म्हणाले, “पंतप्रधान मोदींनी गेली दोन महिने अमित शहा यांनी देखील तितकाच काळ अनेक राज्यात घालविला. पूर्ण यंत्रणा कामा लागील. मोदी-शहांचे अभिनंदन करताना केंद्रीय तपास यंत्रणांचे देखील अभिनंदन केले पाहिजे, असा टोला संजय राऊतांनी लगावला आहे. “मतदान सुरू असताना सुद्धा राजकीय विरोधकांवर धाडी टाकण्याचे काम ते करत होते. आणि विरोधकांच्या प्रचार यंत्रणेला खिळ बसेल, अशा पद्धतीने त्यांचे काम चालू होते. अर्थात लोकशाहीत हे सर्व कौल मान्य करतात. हा जनतेचा खरोखर कौल असेल तर आम्ही मान्य करतो”, असे संजय राऊत म्हणाले.