घरताज्या घडामोडीवीज दरांत प्रतियुनिटमागे दोन रुपयांची वाढ, बिलात किती बदल होणार?

वीज दरांत प्रतियुनिटमागे दोन रुपयांची वाढ, बिलात किती बदल होणार?

Subscribe

वीज उत्पादन खर्च वाढल्याने आणि कंपन्यांचा तोटा भरून काढण्यासाठी वीज दरांत प्रति युनिटमागे दोन रुपायांनी वाढ केल्याचा दावा झी बिझनेसने केला आहे.

गेल्या दोन वर्षांपासून राज्यात वीज दरात वाढ करण्यात आली नव्हती. मात्र, आता अचानक वाढ करण्यात आली असल्याने ग्राहकांना शॉक बसला आहे. वीज उत्पादन खर्च वाढल्याने आणि कंपन्यांचा तोटा भरून काढण्यासाठी वीज दरांत प्रति युनिटमागे दोन रुपायांनी वाढ केल्याचा दावा झी बिझनेसने केला आहे. तर दुसरीकडे दिल्लीतही वीज दर वाढवण्यात आले आहेत. दिल्लीतील विद्युत विनियामक आयोगाने वीजेच्या दरात २ ते ६ रुपयांच्या वाढीला मंजुरी दिली आहे. (Electricity bill hike in Maharashtra and Delhi customers have to pay more electricity bill know why details inside)

कोरोना काळात वीज दरांत वाढ करण्यात आली नव्हती. मात्र, मध्यंतरी कोळशाची निर्यात कमी झाल्याने राज्यावर कर्जाचा बोजा वाढला होता. ही तूट भरून काढण्यासाठी वीज दरांत वाढ करण्यात आली आहे. यानुसार, पुढील पाच महिने राज्यातील नागरिकांवर वीजबिल वाढीचा फटका बसणार आहे. ३०० युनिटपेक्षा जास्त विद्युत तुम्ही वापरत असाल तर तुम्हाला २ रुपये प्रति युनिट अधिक बिल भरावे लागणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा -महावितरणकडून वीज दरात मोठी वाढ; महाराष्ट्राच्या जनतेला बसणार आर्थिक फटका

कसे असतील दर?

- Advertisement -

महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीकेड ३.३ कोटी विद्युत ग्राहक आहेत. घरगुती ग्राहकांनी जर ०-१०० युनिट वीज वापर केला तर त्यांना ६५ पैसे प्रति युनिट अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. तर 101-300 युनिट विद्युत वापर करणाऱ्या ग्राहकाला 1 रुपया 45 पैसे प्रति युनिट जास्त मोजावे लागणार आहेत. 301-500 युनिट विद्युत वापर असणाऱ्या ग्राहकांना बिलात प्रति युनिट 2.05 रुपयांचा बोजा पडेल. तसेच, तर 500 युनिटपेक्षा अधिक विद्युत वापर करणाऱ्या ग्राहकांना प्रति युनिट 1 रुपये 35 पैसे तर व्यावसायिक ग्राहकांना 2.20 रुपये प्रति युनिट अधिभार पडेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -