घरमहाराष्ट्रशेतकऱ्यांवर वीजदरवाढीची वीज कोसळणार

शेतकऱ्यांवर वीजदरवाढीची वीज कोसळणार

Subscribe

महावितरणने प्रस्तावित केलेल्या वीज दरवाढीच्या याचिकेचा सर्वाधिक बोजा हा कृषीपंप वीज ग्राहकांवर पडणार आहे. मे २०१५ सालच्या तुलनेत महावितरणने सुचवलेली दरवाढ ही तिप्पट ते पाचपट इतकी होणार आहे. सव्वा कोटी सर्वसामान्य घरगुती वीज ग्राहकांच्या स्थिर आकारात सुमारे ११५ ते २३८ टक्के वाढ महावितरणने सुचवली आहे. महावितरणने सर्व ग्राहक श्रेणीतील वीज ग्राहकांना सरासरी ३१ टक्के ते ३४ टक्के इतकी वीज दरवाढ सुचवली आहे.

थकबाकीची रक्कम वसुल
महावितरणने कृषीपंप वीज ग्राहकांना प्रत्यक्ष वीज वापरानुसार दर आकारणी करावी. तसेच वीजबिल फुगवून देऊ नये यासाठी महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी काही पर्यायही सुचवली आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष केलेल्या वीज वापराच्या तुलनेत अनेक पटीत वीज दर आकारणी केली आहे. कृषीपंप वीज ग्राहकांच्या सबसिडीपोटी महाराष्ट्र सरकारने १०३ टक्के सबसिडी मोजली आहे. तर याआधी १११ टक्क्यांपर्यंत सबसिडी मोजली आहे. त्यामुळेच वीज ग्राहकांच्या थकबाकीच्या रकमेतील मुद्दल रकमेचा म्हणजे १३ हजार कोटी रूपयांचा भरणा राज्य सरकारने याआधीच केला आहे. त्यामुळेच कृषीपंप थकबाकीपोटीची रक्कम ही मोठी आणि फुगलेली दिसते.

- Advertisement -

सबसिडीचा नवा फॉर्म्युला
आगामी काळात कृषीपंप ग्राहकांसाठी सबसिडीची रक्कम मंजुर करताना राज्य राज्य सरकाने प्रत्यक्ष वीज वापरावर आधारीत पैसे महावितरणला मंजुर करावेत. कृषीपंपाच्या फीडरवर आधारीत आकडेवारीवर ही सबसिडीची रक्कम मंजुर करावी. अनेक राज्यात सबसिडीच्या रूपात देण्यात येणाऱ्या रकमेसाठी हाच फॉर्म्युला वापरण्यात येतो असा होगाडे यांचा दावा आहे. त्यामुळे अतिरिक्त सबसिडी मोजण्याएवजी राज्य सरकारने कृषीपंप ग्राहकांचा प्रत्यक्ष वीज वापर ग्राह्य धरावा असे सुचवले आहे.

कृषीपंपाच्या खऱ्या वीज वापराबाबत राज्य सरकारने महावितरणला योग्य आकडेवारी सादर करण्याचे आदेश देणे गरजेचे आहे. ही आकडेवारी सादर करताना फीडर इनपुट डेटा, डीटीसी इनपुट डेटा, वीज वितरण हानी अशी आकडेवारी सादर करणे गरजेचे आहे.

- Advertisement -

काय आहे मागणी
महावितरणने ३० हजार ८४२ कोटी रूपयांची रक्कम भरून काढण्यासाठी दरवाढीची मागणी केली आहे. ही दरवाढ सरासरी ३० टक्के ते ३४ टक्के इतकी आहे. मीटर ग्राहकांच्या स्थिर आकारात १०८ टक्के दरवाढीची मागणी करण्यात आली आहे. तर उच्चदाब वीज ग्राहकांच्या वीज दरात २३ टक्क्यांची वाढ तसेच स्थिर आकारात १७८ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -