घरताज्या घडामोडीभांडूप परिमंडलमधील ३४ हजार २४७ वीज बिल थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित

भांडूप परिमंडलमधील ३४ हजार २४७ वीज बिल थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित

Subscribe

रायगड जिल्ह्यातील २१६४ ग्रामपंचायतींकडे १३० कोटी स्ट्रीट लाईटची थकबाकी

कोरोनाच्या काळात महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा केला आहे. मात्र, अनेक ग्राहकांनी लॉकडाऊनच्या काळातील वीजबिलाचा भरणा अजून ही केला नाही. भांडूप परिमंडलातील ग्राहकांच्या वीजबिलाची थकबाकी एकूण ५८३ कोटींवर पोहोचली असून मुख्य कार्यालयाच्या आदेशानूसार थकीत वीजबिल असलेल्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची जोरदार मोहीम सुरु झाली आहे. भांडूप परिमंडलात १८ जून २०२१ पासून आतापर्यंत ३४,२४७ ग्राहकांचा वीजपुरवठा थकीत बिलापोटी खंडित करण्यात आला आहे. मुख्य अभियंता श्री. सुरेश गणेशकर स्वतः जातीने लक्ष देऊन वीजबिल वसुलीचा दैनंदिन आढावा घेत आहेत.

वीज बिल न भरल्यामुळे, १८ जून २०२१ पासून भांडूप परिमंडलातील सर्व वर्गवारीतील अनेक ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची धडक मोहीम भांडूप परिमंडलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुरु केले आहे. यामध्ये, ठाणे मंडळातील भांडूप विभागातील २८६९ ग्राहक, मुलुंड विभागातील २७१५, ठाणे-१ येथील २००८, ठाणे-२ विभागातील १९३८ तर वागले इस्टेट येथील ३४३८ ग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरता खंडित करण्यात आला आहे. तसेच, वाशी मंडळातील, नेरूळ विभागातील २६१४ ग्राहकांचा तर पनवेल शहर विभागातील ५३७६ व वाशी विभागातील ३३०८ ग्राहकांचा वीजपुरवठा थकीत वीजबिलामुळे खंडित केला आहे. तसेच, पेण मंडळातील अलिबाग येथे २०३२, गोरेगाव विभाग- २५१५, पनवेल ग्रामीण विभाग २९०९, रोहा विभागातील- २५२५ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला असून भांडूप परिमंडलाने १८ जून २०२१ पासून ३४,२४७ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला आहे.

- Advertisement -

मागील काळात, महावितरण भांडूप परिमंडलातील ६४.२८ कोटी थकबाकीपोटी ७४,६८९ घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरता खंडित केला आहे, ०.२९ कोटी थकबाकीमुळे ६८९ कृषी ग्राहकांचा तर १३४.२६ कोटी थकबाकीमुळे ४०१७ इतर ग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरता खंडित करण्यात आला आहे. यामध्ये, रायगड जिल्ह्यातील २१६४ ग्रामपंचायतींकडे १३० कोटी स्ट्रीट लाईटची थकबाकी आहे.

“कुठल्याही परीस्थितीत महावितरणचे अधिकारी व कर्मचारी अखंडित वीजपुरवठा देण्यासाठी तयार असतात. मात्र, वीजबिलाची वसुलीसाठी त्यांना खूप प्रयत्न करावे लागत आहे. महावितरणची आर्थिक स्थिती लक्षात घेता वीजबिल न भरणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा नाईलाजाने खंडित करावा लागत आहे. सध्या दररोज १०-१५ हजार थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे. ही मोहीम पुढे अजून तीव्र होणार आहे”,असे भांडूप परीमंडलचे मुख्य अभियंता श्री. सुरेश गणेशकर यांनी सांगितले. तसेच, अशी करवाई टाळण्यासाठी ग्राहकांनी आपले वीजबिल भरून महावितरणला सहकार्य करावे. जर ग्राहकांनी आपले वीजबिल भरले नाहीत तर त्यांचे वीज मीटर काढण्याची कारवाई सुद्धा भविष्यात होऊ शकते. तसेच, शेजाऱ्याकडून अथवा परस्पर वीजचोरी करणाऱ्या ग्राहकांवर विद्युत कायदा २००३ च्या कलम १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात येईल अशा इशारा परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. सुरेश गणेशकर यांनी ग्राहकांना दिला.

- Advertisement -

ग्राहकांच्या सोयीसाठी सध्या सुट्टीच्या दिवशीही सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र सुरु आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता, ग्राहक डीजीटल माध्यमाचा वापर करूनही घरबसल्या आपले वीजबिल www.mahadiscom.in किंवा महावितरणच्या मोबाईल एपद्वारे भरू शकतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -