घरमहाराष्ट्रएलिमेंटरी, इंटरमिजिएट परिक्षा लांबणीवर

एलिमेंटरी, इंटरमिजिएट परिक्षा लांबणीवर

Subscribe

विधानसभा निवडणुकीमुळे एलिमेंटरी, इंटरमिजिएट परिक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

विधानसभा निवडणुकीचा फटका शालेय स्तरावर होणाऱ्या एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट या चित्रकला परीक्षांना बसला आहे. यामुळे राज्यातील तब्बल दीड हजार कला शिक्षक निवडणूक कामाच्या प्रशिक्षणात अडकल्याने २६ ते २९ सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय कला संचालनालयाने घेतला आहे. त्यामुळे आता पुन्हा या परीक्षांना केव्हा मुहूर्त मिळणार याकडे शिक्षकांसह विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.


हेही वाचा – जेईई, नीटच्या धर्तीवर एमएच सीईटी परीक्षा

- Advertisement -

या वेबसाइटवर पुढील तारीख कळणार

विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राजकीय कार्यालयाबरोबरच आता शाळा आणि महाविद्यालयांमध्ये देखील ही लगबग पाहायला मिळत आहे. दिवाळीपूर्वीच निवडणूक होणार असून त्याचा निकाल देखील दोन दिवसात लागणार आहे. त्यामुळे शालेय स्तरावर होणाऱ्या एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट या चित्रकला परीक्षा पुढे ढकलण्याचे परिपत्रक काढण्यात आल्याचे कलासंचनालयाचे परीक्षा नियंत्रक नागेश वाघमोडे यांनी सांगितले आहे. परीक्षेचे सुधारित वेळापत्रक कला संचालनालयाच्या www.doa.org.in या वेबसाइटवर स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल, असेही वाघमोडे यांनी म्हटले आहे. राज्यभरातील सुमारे १ हजार १०० परीक्षा केंद्रावर ही परीक्षा होणार होती.

कलाशिक्षकांना निवडणूकीचे काम

बहुसंख्य शिक्षकांना विधानसभा निवडणुकीचे काम लावण्यात आले आहे. त्यामुळे सध्या हे शिक्षक प्रशिक्षणावारीत तसेच मतदार याद्या तयार करण्याच्या कामात व्यस्त आहेत. त्याचप्रमाणे शिक्षकांच्याअभावी या परीक्षा कशा होणार असा प्रश्न उपस्थित झाला असल्याने कला संचनालयाने २६ सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या या परीक्षा रद्द केल्या आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – निवडणुकांमुळे परीक्षांचे वेळापत्रक कोलमडले


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -