जर माझा मृत्यू संशयास्पद परिस्थितीत झाला तर….एलोन मस्कच्या ट्विटमुळे खळबळ

Elon Musk's tweet If I died in mysterious circumstances nice knowin ya
जर माझा मृत्यू संशयास्पद परिस्थितीत झाला तर....एलोन मस्कच्या ट्विटमुळे खळबळ

ट्विटर कंपनी खरेदी केल्यानंतर उद्योजक एलॉन मस्क चर्चेच्या केंद्रस्थानी होते. त्यांचे ट्विटसुद्धा नेहमी चर्चेचा विषय ठरत असतात. अशाच एका ट्विटमुळे चर्चांना उधान आले असून सगळ्यांनाच एलॉन मस्क यांनी विचारात टाकलं आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये मृत्यूविषयी भाष्य केलं आहे. जर माझा मृत्यू संशयास्पद परिस्थितीमध्ये झाला तर nice knowin ya असे एलॉन मस्क यांनी म्हटलं आहे. त्यांच्या ट्विटनंतर नेटकऱ्यांमध्ये चर्चा सुरु झाली आहे. प्रत्येकजण आपल्या परिने अर्थ काढताना दिसत आहे. परंतु एलॉन मस्क यांनी असे का म्हटलं असाव असेही प्रश्न उपस्थित होत आहे.

जगातील प्रसिद्ध उद्योगपती एलॉन मस्क यांनी नुकतेच मोठी खरेदी केली आहेत. ते म्हणजे त्यांनी ट्विटर कंपनी विकत घेतली आहे. ट्विटर विकत घेतल्यामुळेसुद्धा एलॉन मस्क चर्चेत होते. त्यावेळीसुद्धा त्यांच्या ट्विटची चर्चा होत होती. परंतु आज केलेल्या ट्विटमुळे चर्चा आणि अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. एलॉन मस्क यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, जर माझा मृत्यू संशयास्पद परिस्थितीमध्ये झाला तर nice knowin ya असेल, मस्क यांनी केलेल्या ट्विटवर शेकडो चाहत्यांनी आणि नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

एलॉन मस्क यांनी ट्विटमध्ये nice knowin ya या गाण्याचा उल्लेख केला आहे. हे गाणे एका अल्बममधील आहे. TWENTY2 नावाच्या बँडचे हे गाणी असून २०१८ मध्ये प्रसिद्ध झाले आहे. एलॉन मस्क यांनी ट्विट केल्यानंतर तासभरात ३३ हजार लोकांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

एलॉन मस्क यांच्या ट्विटवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. एका नेटकऱ्याने म्हटलं आहे की, जगाला अजून एलॉन मस्क तुमची गरज आहे. यामुळे तुम्ही लवकर सोडून जाऊ शकत नाही. तर एका नेटकऱ्याने म्हटलं आहे की, आपल्याला एलॉन मस्क यांना वाचवावे लागेल. तर एकाने लिहिले आहे की, असा विचार गंमतीमध्ये सुद्धा करु नका, तुम्हाला अजून खूप अडचणी दूर करायच्या आहेत. मस्क यांना काही झाल्यास मी ट्विटर घेऊ शकतो का? असा प्रश्न एका नेटकऱ्याने केला आहे.


हेही वाचा : रशियन तेल खरेदी बंद करण्याचा अमेरिकेसह जी ७ देशांनी घेतला मोठा निर्णय