घरमहाराष्ट्ररेल्वेचा आपत्कालीन वैद्यकीय कक्ष कोमात

रेल्वेचा आपत्कालीन वैद्यकीय कक्ष कोमात

Subscribe

हायकोर्ट आणि रेल्वे बोर्डाच्या आदेशाची अवहेलना

रेल्वे बोर्डाने देशातील सर्व रेल्वे स्थानकांवर प्रवाशांसाठी आपत्कालीन वैद्यकीय कक्ष उभारण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र तरी सुद्धा या आदेशाच पालन रेल्वे विभागाकडून केले जात नाही. लाखो रुपये खर्च करून मध्य आणि रेल्वेने मार्गावर कित्येक स्थानकांवर उभारलेले आपत्कालीन वैद्यकीय केंद्र बंद आहेत. त्यामुळे लाखो रुपये खर्च करून रेल्वेने उभारलेले हे आपत्कालीन वैद्यकीय केंद्र प्रवाशांसाठी बिनकामाचे ठरत आहेत. विशेष म्हणजे पश्चिम रेल्वेचे मुख्यालय असलेल्या चर्चगेट रेल्वे स्थानकाच्या बाजूला असलेल्या आप्तकालीन चिकित्सा कक्ष मागील दोन महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे आपत्कालीन वैद्यकीय कक्षाबद्दल रेल्वेमध्ये उदासीनता दिसून येत आहे. सोबत रेल्वेच्या अकार्यक्षम अधिकार्‍यांना अगोदर कारवाई करण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया समाजसेवक समीर झवेरी यांनी व्यक्त केली आहे.

रेल्वे अपघातातील जखमी आणि रेल्वे प्रवासात प्रवाशाची अचानक प्रकृती खराब झाल्यास त्यांना तातडीने वैद्यकीय सुविधा मिळावी, यासाठी रेल्वे स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय केंद्र सुरु करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने २६ मार्च २००९ रोजी रेल्वेला दिले होते. मात्र या निर्देशाचे काटेकोरपणे पालन रेल्वेकडून होत नाही. २३ मार्च २०१८ रोजी रेल्वे बोर्डाने देशातील सर्व रेल्वे स्थानकांवर वैद्यकीय कक्ष उभारण्याचे आदेश दिले आहे. हायकोर्टाच्या आदेश नंतर मध्य आणि पश्चिम रेल्वेने या आदेशाचे पालन करत रेल्वे स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय केंद्र सुरु केले होते. त्यांची जबाबदारी खासगी हॉस्पिटल आणि औषध निर्माण कंपन्यांना दिले आहे. मात्र त्यांना सुद्धा हे आपत्कालीन वैद्यकीय कक्ष चालवणे जड जात असल्याने अनेकांनी रेल्वे बरोबर झालेले कंत्राट रद्द केले आहे.

- Advertisement -

त्यामुळे आज अनेक रेल्वे स्थानकांवर उभारले गेले आपत्कालीन वैद्यकीय केंद्र धूळ खात पडून आहे. पश्चिम रेल्वेच्या मुख्यालय असलेल्या चर्चगेट रेल्वे स्थानकाच्या बाजूला रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी आपत्कालीन वैद्यकीय केंद्र रेल्वेच्यावतीने भाडे तत्वावर दिले होते. यात काही डॉक्टर व नर्सेस मदतनीस प्रवासी रुग्णांच्या सेवेसाठी या कक्षात उपलब्ध होते. मात्र यंदाच्या पावसाळ्यात या वैद्यकीय केंद्रावर झाड कोसळ्यामुळे तेव्हापासून हे आपत्कालीन वैद्यकीय कक्ष बंद आहे. इतकेच नव्हे तर मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावरील सुद्धा आपत्कालीन वैद्यकीय कक्ष बंद आहे. त्यामुळे रेल्वेच्या कारभारावर आज प्रश्नचिन्ह उपस्थिती होत आहे.

हायकोर्टच्या आदेश असून सुद्धा पश्चिम रेल्वे स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय केंद्र मागील अडीच महिन्या पासून बंद आहे. त्यामुळे रेल्वे अपघातातील जखमी आणि रेल्वे प्रवासात अचानक प्रवाशांची प्रकृती खराब झाल्यास त्यांना ही सुविधा मिळत खूप समस्यांना प्रवाशांना समोर जावे लागत आहे. रेल्वेने जबादार असलेल्या रेल्वे अधिकारी यांच्यावर तत्काळ कारवाई करावी. -समीर झवेरी, सामाजिक कार्यकर्ता

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -