घरCORONA UPDATEUnlock: अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना आता एसटीतून मोफत प्रवास बंद

Unlock: अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना आता एसटीतून मोफत प्रवास बंद

Subscribe

कोरोनाच्या पाश्वभूमीवर अत्यावश्यक सेवा देणाऱ्या मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांसह, राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना एसटी महामंडळाच्या एसटी बसेसमधून मोफत प्रवास करण्याची मुभा दिली होती. मात्र आता शासनाने ही सवलत काढून घेतली आहे. त्यामुळे आता शुक्रवारपासून सर्वसामान्य प्रवाशांप्रमाणे मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांसह, राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना एसटीतून प्रवास करण्यासाठी तिकीट काढावे लागणार आहे. त्यासंबंधीत पत्रकदेखील एसटी महामंडळाच्या सर्व विभागांना पाठवण्यात आले आहे.

लॉकडाऊन काळात राज्यभरातील रेल्वे, एसटी महामंडळ आणि इतर प्रवासी वाहतूक सेवा बंद केल्यानंतर अत्यावश्यक सेवा देण्याची जबाबदारी एसटी आणि बेस्टच्या प्रशासनाला परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली होती. त्यानुसार याकर्मचाऱ्यांना ने-आण करण्यासाठी एसटीच्या विशेष फेऱ्या मुंबई, ठाणे आणि पालघर विभागातून चालवण्यात येत होत्या. दरम्यान, यामध्ये प्रवास करणाऱ्या कर्मचारी जीव धोक्यात घालून कामावर जात असल्याने अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी अधिकाऱ्यांना मोफत प्रवास देण्याची मागणी केली होती. त्यासाठी महानगरपालिका आणि राज्य शासनाने एसटी महामंडळाला आगाऊ रक्कम अदा केली होती. त्यामुळे महानगरपालिका आणि राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना एसटीतून मोफत प्रवास आतापर्यंत सुरु होता. मात्र आता अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी उपनगरी लोकल सेवा सुरु झाली आहे. त्यामुळे आता शासनाने कर्मचाऱ्यांना मोफत प्रवास बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंबंधीत पत्रसुद्धा एसटी महामंडळाला शासनाकडून प्राप्त झाले आहे. त्यामुळे एसटी महामंडळाने सर्व विभागांना पत्र पाठवून शासकीय किंवा अत्यावश्यक सेवेतील सवलत प्रवास १९ जून २०२० पासून बंद करण्याची माहिती दिली आहे. त्यानुसार १९ जून २०२० पासून राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांकडून प्रचलित कार्यपद्धतीनुसार सर्व सवलतीचे व विनासवलतीचे तिकीट प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाच्या प्रवासानुसार तिकीट देऊन सर्व प्रवाशांकडून भाडे वसूल करण्याचे निर्देश दिले आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

‘रेड’ लाईट एरिया झाला ‘ग्रीन’ झोन; आख्ख्या मुंबईसमोर ठेवला आदर्श!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -