घरमहाराष्ट्रकर्मचाऱ्याच्या गैरप्रकाराची वसुली त्याच्या निधनानंतर पत्नीकडून नको; लोकायुक्त कानडे

कर्मचाऱ्याच्या गैरप्रकाराची वसुली त्याच्या निधनानंतर पत्नीकडून नको; लोकायुक्त कानडे

Subscribe

मुंबईः कर्मचाऱ्यावर गैरप्रकारचा ठपका असेल तर त्याच्या निधनानंतर त्याची वसुली पत्नीकडून करु नका, अशी शिफारस लोकायुक्त व्ही. एम. कानडे यांनी केली आहे. याआधी काही वसुली झाली असेल तर ती परत करावी, असेही लोकायुक्त कानडे यांनी सांगितले आहे.

याप्रकरणी ज्योती अशोक राणे यांनी लोकायुक्त कानडे यांच्याकडे तक्रार केली होती. पती अशोक राणे यांचे २१ सप्टेंबर २०१७ रोजी निधन झाले. मात्र ज्योती यांना कुटुंब पेन्शन व अन्य निवृत्तीचे पैसे मिळाले नाहीत, असे या तक्रारीत नमूद करण्यात आले होते.

- Advertisement -

संभाजीनगर येथील गंगापूर पंचायत समिती कार्यालयात अशोक राणे हे कामाला होते. इंदिरा आवास योजनेचे काम करत असताना राणे यांनी गैरप्रकार केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले होते. राणे यांनी निलंबनाला विभागीय आयुक्तांसमोर आव्हान दिले. विभागीय आयुक्तांनी हे निलंबन रद्द केले. २१ सप्टेंबर २०१७ रोजी राणे यांचे निधन झाले. मात्र राणे यांनी केलेल्या गैरप्रकाराची वसुली त्यांच्या ग्रॅच्युटीमधून वसलु करावी. उर्वरित ४० टक्के रक्कम त्यांच्या कुटुंब पेन्शनमधून घ्यावी, असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी काढले.

१ कोटी २९ लाख ६५ हजार २८४ रुपये वसुलीचे आदेश देण्यात आले होते का?. कर्मचाऱ्यावर अनियमिततेचा आरोप असेल तर त्याच्या निधनानंतर ती रक्कम कुटुंबियांकडून वसुल केली जाऊ शकते का?, असा मुद्दा लोकायुक्त कानडे यांच्यासमोर होता.

- Advertisement -

मात्र राणे यांच्यावर ठेवण्यात आरोपात मुख्य आरोपी व्ही. एल. राठोड होते. त्यांच्या ग्रॅच्युटीमधून १०० टक्के रक्कमेची वसुली करा आणि ४० टक्के पेन्शनमधून घ्यावेत, असे आदेश नगर विकास खात्याने जारी केले होते. त्याचाच आधार घेत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी राणे यांच्याकडूनही वसुलीचे आदेश जारी केले होते.

कर्मचाऱ्याच्या निधनानंतर त्याने केलेल्या गैरप्रकाराची वसुली कुटुंबियांकडून करावी किंवा या वसुलीसाठी त्याची मालमत्ता विकावी, असा कोणताही नियम मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सादर केला नसल्याचे लोकायुक्त कानडे यांनी नमूद केले.

उच्च न्यायालयाने एका प्रकरणात अशा प्रकारे वसुली केली जाऊ शकत नसल्याचा निर्वाळा दिला आहे. त्यामुळे ज्योती राणे यांच्याकडून कोणतीही वसुली करु नये, अशी शिफारस लोकायुक्त कानडे यांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -