घरट्रेंडिंगआईवडिलांचा सांभाळ न करणे पडणार महागात; पगारातील ३०% होणार कपात

आईवडिलांचा सांभाळ न करणे पडणार महागात; पगारातील ३०% होणार कपात

Subscribe

आईवडिलांचा सांभाळ न करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारातील ३० टक्के रक्कम होणार कपात.

बोट पकडून चालायला शिकवण्यापासून ते मोठ्या उद्यावर बसवण्यापर्यंत सर्व काही आईवडिल आपल्या मुलांसाठी करत असतात. मुलांना शिकववून त्यांना खूप मोठ करायच, असे एकच ध्येय आईवडिलांचे असते. सतत मुलांना काय हव नको ते पाहणे. त्यांची काळजी घेणे. त्यांना डॉक्टर, इंजिनिअर करण्यासाठी सतत मेहनत घेणे आणि सातत्याने मुलांचे भविष्य उज्जवल करण्यासाठी आयुष्यभर खस्ता खाणे. पण, एकदा का मुल मोठी झाली. नोकरीला लागली का. आईवडिलांच त्यांना ओझ होऊ लागत. मग, त्यांना शेवटच्या टप्प्यात वाऱ्यावर सोडतात. परंतु, आता जर जन्मदात्यांना वाऱ्यावर सोडले तर त्यांच्या मुलांना चांगलेच महागात पडणार आहे. आईवडिलांचा सांभाळ न करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारातील ३० टक्के रक्कम आईवडिलांना दिली जाणार आहे.

आईवडिलांचा सांभाळ न करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनातील ३० टक्के रक्कम आईवडिलांच्या बँक खात्यात जमा करावी लागणार आहे. असा निर्णय विदर्भातील वाशीम या जिल्हा परिषदेने घेतला. वाशीम पंचायत समितीच्या सभापती रेश्मा गायकवाड यांनी यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत ठराव मांडला आहे. या ठरावाचे सर्वांनीच टाळ्यांच्या गजरात स्वागत केले आणि ठराव मंजूर झाला.

- Advertisement -

“आमचा सांभाळ करत नाही, अशी तक्रार जर आईवडिलांनी केली तर त्या मुलांना सर्वप्रथम ताकीद दिली जाईल. त्यानंतरही जर त्यांनी याची दखल घेतली नाही तर मात्र, त्यांच्या पगारातील ३० टक्के कपात केली जाणार आणि ते पैसे आईवडिलांच्या खात्यात जमा केले जातील”, अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी दिली आहे.


हेही वाचा – केवळ १५० रुपयात घ्या LICपॉलिसी; मिळवा १९ लाख रुपये, कधीही काढू शकता पैसे

- Advertisement -

 

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -