घरनवी मुंबईआठवड्याभरात पालिकेत कर्मचारी उपलब्ध होणार, 'महानगर'च्या वृत्तानंतर प्रशासनाला जाग

आठवड्याभरात पालिकेत कर्मचारी उपलब्ध होणार, ‘महानगर’च्या वृत्तानंतर प्रशासनाला जाग

Subscribe

नवी मुंबई – नवी मुंबई महानगरपालिकेच्या आठ नोडमधील विभाग कार्यालयात कर्मचारी नसल्याने कामानिमित्ताने आलेल्या सर्व सामान्य नागरिकांना त्याचा नाहक त्रास सोसावा लागत होता. याबाबत माय महानगर आणि आपलं महानगरने वृत्त प्रकाशित करून नागरी समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते. या वृत्ताची दखल घेत पालिकेच्या कामकाजाच्या दृष्टीकोनातून सहाय्यक आयुक्त व प्रशासनाच्या बदल्या आयुक्त राजेश नार्वेकर यांनी केल्या आहे. तर आगामी आठवड्याभरात पालिकेच्या सर्व विभागात कार्यालयात कर्मचारी उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने पदस्थापना करण्यात येणार असल्याचे प्रशासन विभागाचे उपायुक्त नितीन नार्वेकर यांनी सांगितले.

हेही वाचा – ऐरोली, दिघा वॉर्डमध्ये कर्मचार्‍यांची वानवा; कामे होत नसल्याने नागरिक त्रस्त

- Advertisement -

नवी मुंबई महानगरपालिकेच्या विभागात नागरिक, लोकप्रतिनिधी, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आपल्या समस्या घेऊन येतात. परंतु सर्वच विभाग कार्यालयात कर्मचारी वर्ग अपुरा असल्याने उपस्थित कर्मचार्‍यांकडून कामे करून घेण्यात येत होती. त्यातच अवघे ४० ते ५० टक्के अधिकारी, कर्मचारी असल्याने पालिकेच्या योजनांचा खोळंबा होत होता.पालिकेच्या विभाग कार्यालयात कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत, कामचुकार कर्मचार्‍यांबाबत पालिकेच्या प्रशासन विभागाचे उपायुक्त नितीन नार्वेकर यांचे लक्ष वेधण्यात आले होते. जनतेची कामे व्हावीत, विभाग कार्यालयांमध्ये अधिकारी-कर्मचारी वर्ग उपलब्ध व्हावा यासाठी आपलं महानगरने वृत्त प्रकाशित करुन प्रकाश टाकला होता. कर्मचार्‍यांची पदस्थापना करण्याच्या अनुषंगाने आढावा सुरू असून आठवडाभरात कर्मचारी वर्ग सर्वच आस्थापने व विभाग कार्यालयात उपलब्ध करून दिली जाणार आहेत.

पालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी अधिकार्‍याच्या अंतर्गत बदल्याचे आदेश पत्र काढले आहे. प्रशासकीय कामकाजाच्या सोयीच्या दृष्टीने आणि सार्वजनिक सेवेच्या हितार्थ आदेशान्वये अधिकार्‍यांच्या बदल्या केल्याचे म्हटले आहे. यात सहाय्यक आयुक्त संजय तायडेंची समाज विकास विभागातून घणसोली विभाग कार्यालयात, मालमत्ता विभागातील शशिकांत तांडेल यांची ए-बेलापूर विभाग, घणसोली विभागाचे सहाय्यक आयुक्त शंकर खाडे यांची एच-दिघा विभाग, भांडार विभागाचे चंद्रकांत तायडेंची परवाना विभाग, ए-बेलापूर विभागाचे सहाय्यक आयुक्त मिताली संचेती यांची भांडार विभाग व मालमत्ता विभागात, एच-दिघा विभागाचे सहाय्यक आयुक्त मनोहर गांगुर्डेंची बी-नेरुळ विभागाच्या सहाय्यक आयुक्तपदी, नेरुळ विभागाचे सहाय्यक आयुक्त सुनील पाटील यांच्याकडे ई-कोपरखैरणे विभागात प्रशासकीय अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे.

- Advertisement -

पालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी याबाबतचे परिपत्रक काढून कर्मचार्‍यांनी त्यांच्या बदलीच्या ठिकाणी रुजू व्हावे, जर बदलीच्या ठिकाणी कर्मचारी रुजू होऊन त्याचा अहवाल प्रशासनाकडे सादर केला नाही तर शिस्तभंगाची कारवाई करणार असल्याचे पत्रकात म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -