घरमहाराष्ट्रसायन्स पदवीधरांना राज्य शासनाच्या प्रकल्पात नोकरी

सायन्स पदवीधरांना राज्य शासनाच्या प्रकल्पात नोकरी

Subscribe

महाराष्ट्र शासनाच्या पथदर्शी प्रकल्पात 702 जागांवर भरती आहे. इथे किसान मित्र या पदासाठी भरती आहे. सायन्स पदवीधरांना इथे काम करायची संधी मिळणार आहे.
पद – किसान मित्र
पदाची संख्या – 702
शैक्षणिक पात्रता – B.Sc (कृषी) किंवा B.Sc (उद्यानविद्या)
वयाची अट – 1 जुलै 2019 रोजी 21 ते 46 वर्षापर्यंत हवं. 46 वर्षानंतरच्या व्यक्तींनी अर्ज करू नका.
नोकरीचे ठिकाण पूर्ण महाराष्ट्रभर असेल.
कामाचे स्वरूप – नेमून दिलेल्या गावांमध्ये शेतकर्‍यांना त्यांच्या उत्पादनात वाढ होण्यासाठी अत्याधुनिक तंत्राची माहिती देणं, तंत्रज्ञान प्रचार आणि प्रसारासाठी मल्टिमीडियाचा वापर करणे, गावातली कृषीविषयक पायाभूत साधन सुविधांची माहिती संकलित करणे, प्रयोगशील आणि प्रगतीशील शेतकर्‍यांची गाथा संकलित करणे, ग्रामसभा घेणे अशी बरीच कामे असतात.
अर्जाची फी नाही.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 जुलै 2019
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी https://sarthi-maharashtragov.in/ इथे क्लिक करा
तसेच, तुम्ही सिव्हिल इंजिनियरिंग केले आहे आणि नोकरी शोधताय? मग तुम्हाला चांगली संधी आहे. महाराष्ट्र जलसंपदा विभागात 500 जागांसाठी भरती आहे. या पदासाठी 10 वी उत्तीर्ण आणि सिव्हिल इंजिनियरिंग डिप्लोमा किंवा तत्सम डिगरी हवी. याबद्दल अधिक माहिती पुढीलप्रमाणे-
पद – कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (गट-ब)
पदांची संख्या – 500
शैक्षणिक पात्रता – 10वी उत्तीर्ण आणि सिव्हिल इंजिनियरिंग डिप्लोमा
वयाची अट – 15 ऑगस्ट 2019ला 18 ते 38 वर्षापर्यंत हवे. मागासवर्गीयांना 5 वर्ष सूट मिळेल
नोकरीचं ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र असेल.
अर्ज करायची शेवटची तारीख – 15 ऑगस्ट 2019 ( रात्री 12 वाजेपर्यंत )
अर्जाची फी सामान्य वर्गास 500 रुपये आणि आरक्षण असलेल्यांना 300 रुपये.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -