घरताज्या घडामोडीमे महिन्यात १० हजार ८८६ बेरोजगारांना रोजगार - नवाब मलिक

मे महिन्यात १० हजार ८८६ बेरोजगारांना रोजगार – नवाब मलिक

Subscribe

मे अखेर ६३ हजार ०५५ बेरोजगारांना रोजगार

कोरोनाच्या संकटामुळे बेरोजगारीची समस्या निर्माण झाली असताना कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांद्वारे राज्यात गेल्या म्हणजे मे महिन्यात १० हजार ८८६ बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यात आल्याची माहिती विभागाचे मंत्री नवाब मलिक यांनी मंगळवारी दिली.(Employment to 10 thousand 886 unemployed in May Month – Nawab Malik)   महास्वयंम वेबपोर्टल, ऑनलाईन रोजगार मेळावे आदी विविध उपक्रमांद्वारे राज्यात नोकरीइच्छूक उमेदवार आणि विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांची सांगड घालून रोजगार उपलब्ध करुन देण्यात येतो. अशा विविध उपक्रमांमधून गेल्या वर्षी राज्यात १ लाख ९९ हजार ४८६ उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात यश आले. तर चालू वर्षात जानेवारी ते मे अखेर ६३ हजार ०५५ बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यात आल्याची माहिती मलिक यांनी दिली.

बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने https://rojgar.mahaswayam.gov.in हे वेबपोर्टल सुरु केले आहे. या वेबपोर्टलवर बेरोजगार उमेदवार आपले शिक्षण, कौशल्ये, अनुभव आदी माहितीसह नोंदणी करतात. त्याचबरोबर कुशल उमेदवारांच्या शोधात असलेल्या कंपन्या, उद्योजक, कॉर्पोरेट्स हे सुद्धा या वेबपोर्टलवर नोंदणी करुन त्यांना हवे असलेले कुशल उमेदवार शोधू शकतात. नोकरीइच्छूक उमेदवारांनी या वेबपोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. विभागामार्फत जिल्ह्यांमध्ये वेळोवेळी ऑनलाईन रोजगार मेळाव्यांचेही आयोजन करण्यात येते, अशी माहिती मलिक यांनी दिली.

- Advertisement -

नोंदणीकृत उद्योगांमध्ये नोकरीची संधी

विभागाकडे, महास्वयंम वेबपोर्टलवर आतापर्यंत ८९ हजार ९३८ इतक्या सार्वजनिक व खाजगी उद्योजकांनी नोंदणी केली आहे. यापैकी अनेक उद्योजक आवश्यकतेनुसार त्यांच्याकडील रिक्त पदांची भरती महास्वयंम वेबपोर्टल तसेच कौशल्य विकास विभागाचे ऑनलाईन मेळावे आदी उपक्रमांमधून वेळोवेळी करतात. त्यामुळे नोकरीइच्छूक उमेदवारांना कौशल्य विकास विभागाच्या उपक्रमांमधून नोकरी मिळविण्यासाठी चांगले व्यासपीठ उपलब्ध झाले आहे, असे मलिक यांनी सांगितले.


हेही वाचा – नवाझ शरीफांना भेटायला नव्हतो गेलो, मोदींसोबतच्या व्यक्तिगत भेटीवर मुख्यमंत्री ठाकरेंचं मोठ विधान

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -