घरक्राइमएन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांची ९ तास चौकशी

एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांची ९ तास चौकशी

Subscribe

एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना दुसऱ्यांदा एनआयएच्या चौकशीला सामोरे जावे लागले. सलग दुसऱ्या दिवशी त्यांची नऊ तास चौकशी करण्यात आली. रात्री १० वाजता ते एनआयए कार्यालयातून बाहेर पडले. काल देखील त्यांची चौकशी करण्यात आली.

एन्काऊंटर स्पेशालिस्ट माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांची बुधवारी साडे आठ तास चौकशी करण्यात आल्यानंतर गुरुवारी पुन्हा त्यांना चौकशीसाठी एनआयए कार्यालयात चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास प्रदीप शर्मा हे एनआयए च्या कार्यालयात दाखल झाले होते. ९ तासांच्या चौकशीनंतर त्यांना रात्री दहा वाजता सोडण्यात आले आहे.

- Advertisement -

प्रदीप शर्मा यांनी जिलेटीन कांड्या आणून दिल्या होत्या असे सचिन वाझे याने एनआयए च्या चौकशीत कबूल केले होते. तसेच १४ मोबाईल सिमकार्ड पैकी एक सिम प्रदीप शर्मा हे स्वतः वापरत असल्याचा संशय एनआयए ला आहे, त्याबाबत काही पुरावे एनआयए च्या हाती लागलेले आहे. ३ मार्च रोजी वाझे विनायक शिंदे शर्मा यांना अंधेरी येथे भेटले होते अशीही माहिती एनआयए हाती लागली आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -