केंद्र सरकारने अंमलबजावणी संचालनालयाचे (ईडी) संचालक संजय कुमार मिश्रा यांचा कार्यकाळ एक वर्षांसाठी वाढवण्यात आला आहे. त्यामुळे मिश्रा आता 18 नोव्हेंबर 2023 पर्यंत ईडीचे संचालक म्हणून कार्यरत राहतीत. कर्मचारी मंत्रालयाने याबाबत एक आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार, 1984 बॅचचे आयआरएस अधिकारी संजय कुमार मिश्रा यांना 18 नोव्हेंबर 2023 पर्यंत सेवेची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यांची 19 नोव्हेंबर 2018 रोजी अंमलबजावणी संचालनालयाचे (ED) संचालक म्हणून दोन वर्षांच्या कालावधीसाठी नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर 13 नोव्हेंबर 2020 रोजी केंद्राने जारी केलेल्या आदेशात त्यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ तीन वर्षांवर आणण्यात आला.
गेल्या वर्षी केंद्र सरकारने जारी केलेल्या आदेशात ईडी आणि केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) च्या संचालकांचा कार्यकाळ दोन वर्षांच्या अनिवार्य कालावधीनंतर तीन वर्षांनी वाढवण्याची परवानगी दिली होती. संजय कुमार मिश्रा यांचा कार्यकाळ सलग तिसऱ्यांदा वाढवण्यात आला आहे. गुरुवारी सरकारने जारी केलेल्या आदेशात, मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने अंमलबजावणी संचालनालयाचे संचालक संजय कुमार मिश्रा यांचा कार्यकाळ 18.11.2022 पासून एक वर्षाच्या कालावधीसाठी वाढविला असल्याची माहिती देण्यात आली आहे. केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत ईडी कार्य करते.
The appointments Committee of the cabinet has approved an extension in the tenure of Sanjay Kumar Mishra, as Director of Enforcement in the Enforcement Directorate (ED) for a period of one year. pic.twitter.com/5yLuKvrmdi
— ANI (@ANI) November 17, 2022
संजय मिश्रा हे 1984 च्या बॅचचे भारतीय महसूल सेवा अधिकारी (IRS) आहेत. 19 नोव्हेंबर 2018 रोजी त्यांची ईडीचे संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र पुढील आठवड्यात त्यांचा कार्यकाळ संपत होता, अशात मिश्रा यांना 18 नोव्हेंबर 2023 पर्यंत सेवेची मुदतवाढ देण्यात आली आहे. ते ईडीचे संचालक म्हणून पुढील पाच वर्षे असणार आहे.