महाराष्ट्रातून ईडीने केली २००० कोटींची संपत्ती जप्त

ED raids firms running Chinese betting apps, freezes Rs 47 cr in 4 accounts

राज्यात सुरू असलेल्या ईडीच्या कारवाईमुळे ईडी या शब्दाची सर्वसामान्यांना चांगली ओळख झाली आहे. ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनालयाने मागील एका वर्षात राज्यात केलेल्या कारवाईत तब्बल २,१६७ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. या जप्तीच्या राज्यातील बडे राजकारणी, व्यावसायिक आणि बँकांचा समावेश आहे.

राज्याचे २०२१ हे वर्ष ईडी आणि इतर केंद्रीय तपास यंत्रणेच्या कारवाईसाठी चांगलेच गाजले आहे. ईडीने गेल्या वर्षभरात राज्यातील नेते आणि व्यावसायिक आणि बँकांचे घोटाळे बाजारावर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईनंतर ईडीकडून एकट्या महाराष्ट्रात राजकीय नेते, बँक घोटाळेबाज आणि व्यावसायिकांवर केलेल्या कारवाई नंतर मोठ्या प्रमाणात त्यांची संपत्ती जप्त केली आहे.

ईडीने २०२१ या वर्षात सुमारे २ हजार १६७ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. जप्त करण्यात आलेल्या संपत्तीमध्ये प्रताप सरनाईक, एकनाथ खडसे, अनिल देशमुख यांच्यासारख्या अनेक नेत्यांच्या संपत्तीचा यात समावेश आहे. तर पीएमसी बँक घोटाळा, एचडीआयएल, डीएचएफएल अशी काही कॉर्पोरेट उद्योजकांच्या संपत्तीचा समावेश आहे.

डिसेंबर २०२० मध्ये कारवाई करण्यात आलेल्या रत्नाकर गुट्टे यांच्या संपत्तीचा ताबा दोनच दिवसांपूर्वी ईडीने घेतला आहे. गट्टे यांची सुमारे २५५ कोटींची संपत्ती जप्त केली आहे. एकनाथ खडसे यांची ५.७३ कोटी रुपयांची संपत्ती, कर्नाळा नागरी सहकारी बँक घोटाळा आमदार विवेक पाटील यांची २४३ कोटी, अनिल देशमुख ४ कोटी २० लाख, जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना प्रकरणात ६५ कोटी, भावना गली यांचे निकटवर्तीय सईद खान ३.७५ कोटी, आमदार प्रताप सरनाईक यांचे ११२ फ्लॅट जप्त, नागपूरमधील एम्प्रेस मॉल ४८३ कोटी रुपयांच्या संपत्तीचा ताबा, वाधवान ग्लोबल कॅपिटलची ५७८ कोटी रुपयांची संपत्ती जप्त, पीएमसी बँक घोटाळा प्रकरणात २३३ कोटी रुपयांचे शेअर्स यांचा या जप्तीमध्ये समावेश आहे.