घरCORONA UPDATEइंजिनिअरिंग डिप्लोमाच्या परीक्षा ९ जुलैपासून

इंजिनिअरिंग डिप्लोमाच्या परीक्षा ९ जुलैपासून

Subscribe

इंजिनिअरिंग डिप्लोमालाही शेवटच्या सत्राची परीक्षा घेण्यात येईल असा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाने घेतला असून, त्यांची परीक्षा ९ जुलैपासून घेण्यात येणार आहे.

कोरोनामुळे देशात जाहीर झालेल्या लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने मार्गदर्शक तत्वे जाहीर केली. यानुसार राज्य सरकारनेही पदवीच्या शेवटच्या सत्राची परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. आता इंजिनिअरिंग डिप्लोमालाही शेवटच्या सत्राची परीक्षा घेण्यात येईल असा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाने घेतला असून, त्यांची परीक्षा ९ जुलैपासून घेण्यात येणार आहे.

मंडळाने गुरुवारी पार पडलेल्या बैठकीत सर्व पदविका अभ्यासक्रमांच्या शेवटच्या सत्राची परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. सहा सत्राच्या इंजिनीअरिंग पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची सहव्या सत्राची तर दोन वर्षांच्या औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाची दुसऱ्या वर्षाची परीक्षा घेण्यात येणार आहे. तीन वर्षाच्या मायनिंग अभ्यासक्रमाची तृतीय वर्षाची तर आठ सत्रांच्या अर्धवेळ अभ्यासक्रमाची आठव्या सत्राची परीक्षा घेण्यात येईल. या सर्व परीक्षांचे आयोजन ९ जुलैपासून पुढे करण्यात येईल. याचे वेळापत्रक मंडळाच्या वेबसाइटवर जाहीर करण्यात येईल. याचबरोबर या आधीच्या सत्राच्या विद्यार्थ्यांची परीक्षा न होता त्यांना सम सत्रातील अथवा अंतर्गत मूल्यमापन करून गुण दिले जाणार आहेत.

- Advertisement -

तर औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमातील टीएमचे गुण मुल्यांकन फक्त प्रथम व द्वितीय चाचणी परीक्षेक्ष्या आधारे करण्यात येईल. यासाठीही ५०:५० चे सूत्र वापरण्यात येईल. यात लगतच्या आधी एका सत्राचे ५० टक्के गुणांच्या अधारावा व ज्या सत्राचे निकाल जाहीर करायाचा आहे त्याच्या ५० टक्के अंतर्गत गुणाच्या अधारावर गुण देऊन निकाल जाहीर करण्यात येईल असेही ठरविण्यात आले आहेत. तसेच आताचा लॉकडाऊनचा कालावधी विद्यार्थ्यांची उपस्थिती ग्राह्य धरण्यात येणार आहे.

शैक्षणिक वर्षाचे अंदाजित वेळापत्रक

तंत्रनिकेतन संस्था सुरू होणार – १५ जून
परीक्षा पूर्व कामे – ३० जून
अंतर्गत परीक्षांचे आयोजन – १ ते ८ जुलै
अंतिम परीक्षांचे आयोजन – ९ जुलैपासून पुढे
निकाल जाहीर होणार – ऑगस्टचे प्रथम वर्ष
२०२०-२१ शैक्षणिक वर्ष द्वितीय वर्षापुढील डिप्लोमा – १ ऑगस्ट
२०२०-२१ शैक्षणिक वर्ष प्रथम वर्ष डिप्लोमा – १ सप्टेंबर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -