घरमहाराष्ट्रइंजिनियरिंग,फार्मसीची प्रवेश प्रक्रिया जाहीर

इंजिनियरिंग,फार्मसीची प्रवेश प्रक्रिया जाहीर

Subscribe

कोरोना पार्श्वभूमीवर एमएचटी सीईटीची परीक्षा विलंबाने झाली. मात्र २८ नोव्हेंबरला निकाल जाहीर झाल्यानंतर सीईटी सेलकडून तातडीने प्रवेश प्रक्रिया राबवण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार ९ डिसेंबरपासून इंजिनियरिंग आणि फार्मसी अभ्यासक्रमच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होत आहे.

यंदा कोरोनामुळे व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा उशिराने सुरू झाल्या. यामुळे प्रवेश प्रक्रियेला विलंब झाला आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर केल्यानंतर सीईटी सेलने आता प्रवेश प्रक्रियेला सुरूवात केली आहे. त्यानुसार मंगळवार एमबीए आणि आर्किटेक्ट या अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षा सुरू झाल्यानंतर आता इंजिनीअरिंग आणि फार्मसीच्या अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला बुधवारपासून सुरूवात करण्यात येत आहे. यंदा इंजिनीअरिंग, औषधनिर्माणशास्त्र व कृषी अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षेला तीन लाख ८६ हजार ६०४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे लक्ष प्रवेश प्रक्रियेकडे लागले होते.

- Advertisement -

इंजिनियरिंग अभ्यासक्रमाचे वेळापत्रक
ऑनलाइन नोंदणी – ९ ते १५ डिसेंबर
कागदपत्र पडताळणी – ९ ते १६ डिसेंबर
तात्पुरती गुणवत्ता यादी – १८ डिसेंबर
हरकती नोंदवणे – १९ व २० डिसेंबर
अंतिम गुणवत्ता यादी – २२ डिसेंबर
कॅप राऊंड १ साठी सीट मॅट्रिक्स जाहीर – २२ डिसेंबर
पहिली सामायिक प्रवेश फेरी – २३ ते २५ डिसेंबर
तात्पुरती प्रवेश यादी जाहीर – २८ डिसेंबर
हरकती व प्रवेश प्रक्रिया – २९ ते ३१ डिसेंबर
कॅप राऊंड २ ला सुरुवात – १ जानेवारी २०२१

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -