घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रशिवस्तुती नृत्याविष्काराने रसिक मंत्रमुग्ध

शिवस्तुती नृत्याविष्काराने रसिक मंत्रमुग्ध

Subscribe

२९ वा पंडित गोपीकृष्ण जयंती महोत्सव, ११ मात्रांच्या तालाचे विशेष आकर्षण

नाशिक : देहावसान नृत्य, शिवस्तुतीवर नृत्यांगनांनी धरलेला ठेका, त्यातून होणारा नृत्याविष्कार शास्त्रीय नृत्यरसिकांनी अनुभवला. निमित्त होते, कीर्ती कला मंदिर आयोजित 29 व्या पंडित गोपीकृष्ण जयंती महोत्सवाचे. पंडित गोपीकृष्ण जयंती महोत्सवाचे उडान ‘द अटर्नल बॉण्ड’चे द्वितीय पुष्प ज्येष्ठ नृत्यांगना पंडिता उमा डोग्रा यांच्या गंडा बंध शिष्या इंद्रायणी मुखर्जी यांनी तयार केलेली ‘निर्वाना थ्रू डान्स पंडित दुर्गालाल’ ही चित्रफीत दाखवून झाली. पंडित दुर्गालाल यांचे देहावसान नृत्य सादर करताना झाले होते. याबद्दल पंडिता उमा डोग्रा यांनी संवाद साधला.

यानंतर पंडिता उमा डोग्रा यांच्या विद्यार्थिनी इंद्रायणी मुखर्जी, सरिता कालेले, विनिता वेणूगोपाल यांनी मोहक शिवस्तुती सादर केली. जदेवांच्या गीतगोविंदमधील दुर्मिळ रचना अष्टपदी-सखी हे उमा डोग्रा यांनी सादर केले. त्यास रसिकांनी भरभरून दाद दिली. त्यानंतर राग बिहाद ह्या आधा त्रिताल समजल्या जाणार्‍या 11 मात्रा असलेल्या तालाची प्रस्तुती त्यांच्या विद्यार्थिनींनी केली. ही रचना पंडित दुर्गालाल यांनी केली होती. या रचनेने कार्यक्रमाचा समारोप झाला. पंडित गोपीकृष्ण जयंती महोत्सवाच्या दुसर्‍या दिवसाची प्रारंभी प्रमुख अतिथी पंडित डॉ. अविराज तायडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी मंचावर रेखा नाडगौडा,अदिती पानसे उपस्थित होत्या. याप्रसंगी नंदकिशोर भुतडा, जयंत नाईक, डॉ अनिरुद्ध धर्माधिकारी, डॉ. पल्लवी धर्माधिकारी आदी उपस्थित होते. पियू आरोळे यांनी सूत्रसंचालन केले.

- Advertisement -

गुरुवंदनेने महोत्सवाला प्रारंभ

कीर्ती कलामंदिर आयोजित २९ व्या नटराज पं. गोपीकृष्ण जयंती महोत्सवाला ‘उडान’ या शीर्षकाखाली गुरुवंदनेने शनिवारी (दि. २०) सकाळी प. सा. नाट्यगृहात प्रारंभ झाला. प्रणम्य शिरसा देवम या गणेशस्तुतीने महोत्सवाची पूजा बांधण्यात आली. छोट्या नृत्यांगनांनी नादारूप मोहक आविष्काराने गणेशाची विविध रूपे उलगडताना आकार शुद्धता, मूर्तता आणि अभिजातता दाखवून दिली. त्यानंतर गुरुवंदना आणि त्रितालाच्या तोडे, तुकडे, तिहाई, ततकार सादर होताच रसिकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
गणिती अंकातून पेश होणार्‍या गिनतीतून रंगमंचावर नृत्यांगना वेदिका, अवनी, अनन्या, आणि सिद्धी यांच्या लयबद्ध पद्धतीने तसेच जोरकस पढंतने रसिकांची मने जिंकली. कलीकेसारख्या नाजूक गोड मुलींचा कलिका कशा ग बाई फुलल्या या गीतावरील भावमुद्रा भाव खाऊन गेल्या या चिमुरड्यांना रंगमंचावर पाहणं हा वेगळाच आनंद होता. यावेळी सार्वजनिक वाचनालय नाशिकचे अध्यक्ष प्राध्यापक दिलीप फडके आणि दातार कॅन्सर डायग्नोसिसच्या स्नेहा दातार, कीर्ती कलामंदिरच्या ज्येष्ठ नृत्यांगना रेखा नाडगौडा, अदिती पानसे उपस्थित होत्या. तबल्यावर सुजित काळे आणि कीबोर्डवर ईश्वरी दसककर यांनी साथसंगत केली. पियू आरोळे यांनी सूत्रसंचालन केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -