Saturday, April 10, 2021
27 C
Mumbai
घर उत्तर महाराष्ट्र कारमध्ये स्वतःवर गोळ्या झाडून उद्योजकाची आत्महत्या

कारमध्ये स्वतःवर गोळ्या झाडून उद्योजकाची आत्महत्या

Related Story

- Advertisement -

सटाणा शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या यशवंनगरजवळील जोगेश्वरी फर्टिलायझर्स या दुकानासमोरील हायवेवर आज (दि.७) दुपारी उद्योजक कारमध्ये रिव्हॉल्व्हरमधून स्वतःच्या डोक्यात गोळ्या झाडून आत्महत्या केली. नंदलाल गणपत शिंदे (वय ५५, रा.सामोडे, ता.साक्री, जि.धुळे, सध्या रा. सिडको, नाशिक) असे मृत्यू झालेल्या उद्योजकाचे नाव आहे. ते कामटवाडा, नाशिक येथील मनसेचे नेते व महिंद्रा अँड महिंद्रामधील युनियनचे माजी पदाधिकारी होते. या घटनेने जिल्ह्यात खळबळजनक घडली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, नंदलाल शिंदे (एमएच 15-एफटी-0133) या कारमधून सामोडे येथून नाशिककडे निघाले होते. ते ताहाराबाद रोडवरील यशवंतनगरजवळ आले. त्यावेळी त्यांचे मावसभावाशी बोलणे झाले. माझी गाडी चालवण्याची परिस्थिती नसून, मी सटाणाजवळील जोगेश्वरी फर्टिलायझर्स समोर उभा आहे, असे त्यांनी मावसभावाला मोबाईलवर संपर्क साधत सांगितले. शिंदे यांचा मावसभाऊ व इतर दोन नातेवाईक घटनास्थळी आले असता ते आपल्या स्कोडा कारमध्ये ड्रायव्हर सीटवर रक्ताच्या थारोळ्यात आढळून आले. घटनेची माहिती मिळताच सटाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण पाटील, पोलीस हवालदार नवनाथ पवार, विजय वाघ, बैरागी यांनी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी प्रथम रिव्हॉल्व्हर ताब्यात घेतली. पोलिसांनी घटनास्थळी रुग्णवाहिकेला पाचारण करून शिंदे यांचा मृतदेह सटाणा ग्रामीण रुग्णालयात नेला. पुढील तपास सटाणा पोलिसांनी सुरू केला आहे.

- Advertisement -