घरCORONA UPDATEनव्या व्हेरियंटचा महाराष्ट्रात शिरकाव, आरोग्य विभागाकडून काळजी घेण्याचे आवाहन

नव्या व्हेरियंटचा महाराष्ट्रात शिरकाव, आरोग्य विभागाकडून काळजी घेण्याचे आवाहन

Subscribe

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या वाढतेय. नव्या व्हेरियंटचेही रुग्ण महाराष्ट्रात आढळत आहेत. राज्यात एक्सबीबी व्हेरियंटचे १८ नवे रुग्ण आढळले आहेत. तर, बीक्यू १ आणि बीए २.३.२० या व्हेरियंटचा प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. (New Variant of Corona entered in Maharashtra)

राज्यात तीन नव्या व्हेरियंटचे २० रुग्ण साडपले आहेत. यापैकी १३ रुग्ण पुण्यातील आहेत. तर, नागपूर आणि ठाण्यातील प्रत्येक दोन तर अकोल्यात एक रुग्ण आहे. तसंच, पुण्यातच बीक्यू.1 आणि बीए.2.3.20 या व्हेरियंटचा प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. हे सर्व रुग्ण सौम्य स्वरूपाचे आहेत. बाधित झालेल्या २० पैकी १५ जणांनी लसीकरण घेतलेले असून पाच जणांची माहिती अद्याप आलेली नाही. पुण्यातील बीक्यू.1 रुग्ण सौम्य स्वरूपाचा असून त्याचा अमेरिका प्रवासाचा इतिहास आहे.

- Advertisement -

नैसर्गिक जीवनक्रम

जनुकीय रचनेमध्ये बदल होत राहणे हा विषाणूच्या नैसर्गिक जीवनक्रमाचा एक भाग आहे. त्यामुळे या घाबरून न जाता कोविड संदर्भात आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागानं केलं आहे.

- Advertisement -

राज्यात आज 418 नवे रुग्ण 

राज्यात कोरोनाचे ४१८ नवीन कोरोना रुग्ण सापडले आहेत. तर, तीन रुग्णांचा मृत्यू झालाय. ५१५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ७९,७७,६११ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१४ टक्के एवढे झाले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -