मढ येथील कथित स्टुडिओ घोटाळ्याप्रकरणी अस्लम शेख यांना पर्यावरण मंत्रालयाची नोटीस

Aslam Sheikh

काँग्रेस नेते अस्लम शेख यांना मढमधील कथीत स्टुडिओ घोटाळा प्रकरणात पर्यावरण मंत्रालयाने नोटीस पाठवली आहे. या प्रकरणी मुंबई जिल्हाधिकारी आणि पालिकेला कठोर कारवाई करण्याचे आदेश पर्यावरण विभागाने दिले आहेत. याबाबत किरीट सोमय्या यांनी ट्वीट करून माहिती दिली आहे.

ट्विटमध्ये काय? –

ट्वीट मध्ये असलम शेख – मढ मार्वे ₹1000 कोटींचा स्टुडिओ घोटाळा. महाराष्ट्राच्या पर्यावरण मंत्रालयाने नोटीस जारी केली आहे. मुंबई जिल्हाधिकारी आणि महानगरपालिकेला कठोर कारवाई करण्यास सांगितलं. मला स्टुडिओ तोडण्याची कारवाईची अपेक्षा आहे, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.

किरीट सोमय्यांचा आरोप काय? –

अस्लम शेख यांनी समुद्रात स्टुडिओ उभारला आहे. असे पाच स्टुडिओ आहेत. ज्यात CRZ नियमांच उल्लघन केले आहे. गोपाळ शेट्टी यांच्यासोबत मी पाहणी केली. कागदावर ही जागा समुद्रापासून दूर दाखवली आहे. आदित्य ठाकरे यांनी पण येथे भेट दिली होती. ज्या जागेवर 2019 साली काही नव्हते तिथे 2021 ला स्टुडिओ उभारला आहे. अस्लम शेख आणि भाटिया स्टुडिओ यांचे मालक भागीदार असल्याचे सांगितले जाते आहे. मंग्रो तोडून स्टुडिओ उभारले आहेत. या जागेवर पर्यावरण विभागाने सहा महिन्यासाठी फिल्म सेट उभारणी साठी परवनगी दिली होती. मात्र, अस्लम शेख यांच्या आशीर्वादाने एक हजार कोटी रुपयांचा स्टुडिओ उभारले आहेत, असा आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे.