घरताज्या घडामोडीऔषध पुरवण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून नियंत्रण कक्ष

औषध पुरवण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून नियंत्रण कक्ष

Subscribe

देशात करोनाचा विळखा वाढत असताना राज्यात औषधांचा तुटवडा कायम आहे. याच पार्श्वभूमीवर अन्न आणि औषध प्रशासनाने नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे.

देशात करोनाचा विळखा वाढत असताना राज्यात औषधांचा तुटवडा कायम आहे. याच पार्श्वभूमीवर अन्न आणि औषध प्रशासनाने नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे. या नियंत्रण कक्षात अधिकाऱ्यांकडून आतापर्यंत १२ तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे. हा नियंत्रण कक्ष अन्न आणि औषध प्रशासनाच्या मुख्यालयातील पोलीस अधीक्षक तथा सह आयुक्त (दक्षता) सुनील भारद्वाज यांच्या नियंत्रणात सुरु राहणार आहे.

आतापर्यंत एफडीएकडून १२ तक्रारींचे निवारण

करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उद्‌भवलेली स्थिती लक्षात घेता औषधांचा पुरवठा आणि उत्पादन सुरळीत ठेवण्यात येणाऱ्या अडचणींच्या निराकरणासाठी अन्न आणि औषध प्रशासनाने नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे. सध्या जगात, देशात आणि राज्यात करोना विषाणूचा वाढत्या विळख्याला नियंत्रणात ठेवण्यासाठी औषधांचा पुरेसा साठा अत्यंत गरजेचे आहे. शिवाय, या परिस्थितीत जनतेला सर्व आवश्यक औषधे नियमित उपलब्ध होणे आवश्यक आहे. औषध वितरण आणि उत्पादन हे अत्यावश्यक सेवेमध्ये मोडले जाते. पण, औषध वितरण नियमित ठेवणे आणि औषध उत्पादन सुरळीत सुरु ठेवणे यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. या अडचणींवर मात करुन त्यासंबंधित काही अडचणी आल्यास नियंत्रण कक्षातील दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

- Advertisement -

म्हणून नियंत्रण कक्षाची स्थापना

सध्या महाराष्ट्र करोनाच्या दुसऱ्या टप्प्यात असून, पुढचे पंधरा दिवस राज्यासाठी महत्त्वाचे असणार आहेत. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून औषध वितरण नियमित ठेवणे आणि उत्पादन सुरळीत ठेवण्यात येणाऱ्या अडचणींची परिस्थिती हाताळली जाणार आहे. मंगळवारी रात्री सुरु झालेल्या या नियंत्रण कक्षात बुधवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत १२ जणांनी संपर्क साधला असून एफडीएकडून यांच्या तक्रारीचे निवारण करण्यात आले आहे, अशी माहिती एफडीएच्या अधिकृत अधिकाऱ्यांनी दिली आहे. तसेच १८००२२२३६५ -०२२- २६५९२३६२\ ६३ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन एफडीएकडून करण्यात आले आहे.


हेही वाचा – कांदा पुन्हा रडवणार; बाजारपेठेतील कांदा लिलाव बंद

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -