घरमहाराष्ट्रगोवर नियंत्रणासाठी राज्यस्तरीय कृति गटाची स्थापना

गोवर नियंत्रणासाठी राज्यस्तरीय कृति गटाची स्थापना

Subscribe

मुंबई : गोवरचा संसर्ग रोखून त्यावर नियंत्रण आणण्यासाठी राज्य सरकारने ११ तज्ज्ञ डॉक्टरांचा राज्यस्तरीय कृती गट (टास्क फोर्स) स्थापन केला आहे. राज्याचे माजी आरोग्य महासंचालक डॉ. सुभाष साळुंके यांच्या अध्यक्षतेखाली या कृती गटात ११ सदस्य आहेत.

मागील काही दिवसांपासून राज्यात गोवरचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. यात मुंबईत गोवरचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून आले आहेत. याशिवाय नागपूर, चंद्रपूर, अकोला, ठाणे, भिवंडी, वसई – विरार, रायगड, मालेगाव, औरंगाबाद,पिंपरी-चिंचवड ,बुलढाणा या जिल्ह्यातही गोवरचे रुग्ण सापडले आहेत.

- Advertisement -

आतापर्यंत राज्यात गोवरने १८ मुलांचा बळी घेतला आहे. तर राज्यात आतापर्यंत १२ हजार २४१ गोवरचे संशयित रुग्ण आढळले आहेत. या वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्याच्या आरोग्य विभागाने गोवर प्रतिबंधक उपाययोजना कृती गट स्थापन केला आहे.

या कृती गटात बालरोग तज्ज्ञ डॉ. आरती किणीकर, डॉ. प्रमोद जोग, आरोग्य सेवेचे माजी संचालक पी.एस. डोके, संचालक डॉ. अब्राहम, साथरोग सहाय्यक संचालक डॉ. प्रदीप आवटे, मुंबई महापालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे, आरोग्य विभागाच्या वरिष्ठ सल्लागार डॉ. मृदुला फडके, ज्येष्ठ बालरोग तज्ज्ञ डॉ. मंगेश पाटे, डॉ.यशवंत आमडेकर आणि डॉ. नितीन आंबाडेकर यांचा समावेश आहे.


कर्नाटकची महाराष्ट्राविरोधात आणखी एक खेळी; जतच्या दुष्काळी भागात सोडले पाणी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -