घर महाराष्ट्र सर्वोच्च निकालापूर्वीच शिंदे गटातील 'हा' आमदार ठाकरेंच्या संपर्कात; खैरेंचा मोठा दावा

सर्वोच्च निकालापूर्वीच शिंदे गटातील ‘हा’ आमदार ठाकरेंच्या संपर्कात; खैरेंचा मोठा दावा

Subscribe

खैरे म्हणाले की शिंदे गटात ( शिवसेना) शेवटच्या क्षणी सामिल राहणारे आमदार, म्हणजेच उदय सामंत हे ठाकरेंच्या संपर्कात आहेत. त्यांच्या या दाव्यानंत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निर्णय आता लवकरच लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयातील पाच न्यायमूर्तींचं घटनापीठ  यावर निर्णय देणार आहे. परंतु त्याआधी  शिंदे गटात आणि ठाकरे गटात अस्वस्थता दिसून येत आहे. अनेक नेतेमंडळी प्रतिक्रिया देत आहेत. आता ठाकरे गटातील नेते चंद्रकांत खैरे यांनी  मोठा दावा केला आहे.

खैरे म्हणाले की शिंदे गटात ( शिवसेना) शेवटच्या क्षणी सामिल राहणारे आमदार, म्हणजेच उदय सामंत हे ठाकरेंच्या संपर्कात आहेत. त्यांच्या या दाव्यानंत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.( Even before the Supreme verdict Uday Samant of the Shinde group contacted Uddhav Thackeray chandrakant Khair s big claim ) खैरे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर शिंदे गटातील अनेक आमदार फुटणार आहेत. ते पुन्हा आमच्याकडे येऊ शकतात. उद्या काय परिस्थिती निर्माण होईल, हे माहिती नाही. परंतु, उद्धव ठाकरे यांचा मोठा विजय होईल, असा विश्वास चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केला आहे.

- Advertisement -

मी हिंदुत्ववादी जरी असलो तरी मी देव भक्त आहे. मी न्यायालयाला विनंती करु शकत नाही. मात्र, मी देवाला प्रार्थना करु शकतो. राज्याचा सत्ता संघर्षाचा निकाल हा उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागू दे. सत्ता संघर्षाच्या निकालानंतर जे जाणार आहे त्याच्यावर काय बोलायचं? उर्वरित आमदार जे आहेत ते बाद होतील. मात्र, जे मस्तीत वागत होते, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांना काहीही बोलत होते. ती मस्ती लोकांना पटली नाही. ती मस्ती आता रिकामी होईल, असे चंद्रकांत खैरे यांनी म्हटले.

निर्णयाकडे सर्वांचं लक्ष 

सत्तासंघर्षाचा निकाल आज (11 मे) थोड्याच वेळात लागणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदार अपात्र ठरणार की नाही याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. हे 16 आमदार अपात्र ठरले तर शिंदे-फडणवीस सरकार कोसळेल असे कायेदतज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाकडे महाराष्ट्रासह देशाचे लक्ष लागून राहिले आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -