पावसात ट्रेनमध्ये अडकलात तरी नो टेन्शन! पालिकेकडून नाश्ता आणि बसची सोय

मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहल यांनी काल पालिका मुख्यालयात पावसाळ्यात आपत्कालीन व्यवस्थापन बाबत संबंधित खाते व प्रमुख अधिकारी यांची महत्वाची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी वरीलप्रमाणे आपत्कालीन व्यवस्था सज्ज ठेवण्याचे आदेश प्रशासकीय यंत्रणेला दिले.

मुंबईत अतिवृष्टी होऊन लोकल ट्रेन सेवा विस्कळीत झाल्यास सदर ट्रेनमध्ये अडकलेल्या प्रवाशांसाठी पर्यायी व्यवस्था म्हणून बेस्ट उपक्रमाच्या ४०० जादा बसेस वेगवेगळ्या ठिकाणांहून सोडण्यात येणार आहेत. तसेच, एसटी महामंडळाच्या ११ बसगाड्या सोडण्यात येणार आहेत. त्यासाठी आवश्यक ‘सुनिश्चित कार्यपद्धती’ तयार करून त्यावर अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यामुळे ट्रेनमध्ये अडकलेल्या प्रवाशांना यंदाच्या पावसाळ्यात मोठा दिलासा मिळणार आहे. (Even if you are stuck in the train in the rain, no tension! Breakfast and bus facility provided by the municipality)

हेही वाचा – पावसाच्या दमदार हजेरीमुळे तानसा आणि तुळशी तलावाच्या पाणीपातळीत वाढ, मुंबईकरांच्या पाणीकपातीचे टेन्शन दूर

मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहल यांनी काल पालिका मुख्यालयात पावसाळ्यात आपत्कालीन व्यवस्थापन बाबत संबंधित खाते व प्रमुख अधिकारी यांची महत्वाची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी वरीलप्रमाणे आपत्कालीन व्यवस्था सज्ज ठेवण्याचे आदेश प्रशासकीय यंत्रणेला दिले.

राज्याचे नवीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ५ जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास मुंबई महापालिका मुख्यालयात आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी पावसाळ्यात अतिवृष्टी होऊन लोकल ट्रेन बंद पडल्यास ट्रेनमध्ये अडकलेल्या प्रवाशांसाठी पालिकेने तात्काळ चहा, पाणी, नाश्ता व बेस्ट आणि एसटी बसगाड्यांची पर्यायी व्यवस्था करण्याचे आदेश दिले होते.

हेही वाचा बूस्टर डोससाठी राज्यात संपूर्ण यंत्रणा उभी करणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

त्यावर पालिका आयुक्त यांनी, आजच्या बैठकीत पावसाळी कामांचा आढावा घेऊन वरीलप्रमाणे पर्यायी व्यवस्था करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, पालिकेच्या २४ विभाग स्तरावर व इतर संबंधित संस्थांच्या स्तरावर समन्वय अधिकारी नेमण्याचे आदेशही आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

त्याचप्रमाणे, लोकल ट्रेन बंद असण्याच्या परिस्थितीत प्रवाशांना आवश्यकतेनुसार प्राथमिक वैद्यकीय उपचार व इतर आवश्यक मदत देण्यासाठी नियोजन करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

लोकल ट्रेन सेवा विस्कळीत झाल्यास अशावेळी प्रवाशांना सुरक्षित स्थळी हलविण्यासह आवश्यक ती मदत योग्यप्रकारे मिळावी, यादृष्टीने महापालिकेच्या विभागांनी त्यांच्या स्तरावर रंगीत तालीम (मॉक ड्रील) आयोजित करण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत.

या बैठकीला अतिरिक्त आयुक्त आश्विनी भिडे, आशिष शर्मा, पी. वेलरासू, डॉ. संजीव कुमार हे संबंधित सह आयुक्त, उप आयुक्त, सहाय्यक आयुक्त, संचालक (आपत्कालीन व्यवस्थापन) महेश नार्वेकर, संबंधित खाते प्रमुख यांच्यासह बेस्ट उपक्रम, मध्य व पश्चिम रेल्वे, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (एसटी महामंडळ) संबंधित संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.