घरठाणेचांदीच्या ताटात जेवायला मिळाले, तरी त्या जेवणाला आईच्या हाताची चव नाही -...

चांदीच्या ताटात जेवायला मिळाले, तरी त्या जेवणाला आईच्या हाताची चव नाही – जितेंद्र आव्हाड

Subscribe

आईच्या हातचे जेवण चविष्ट लागते कारण ती आपली आई असते. दुसऱ्याने चांदीच्या ताटात जेवायला दिले, तरी त्याला आईच्या हाताने मिळणाऱ्या जेवणाची चव येत नाही, असा आमदार डॉ जितेंद्र आव्हाड यांनी टोलाही फुटीर नगरसेवकांना लगावला. याचदरम्यान, यापुर्वी भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी आमदारकी तर, उद्धव ठाकरे यांनी पक्षात मोठे पद देण्याबाबत विचारणा केली होती. पण, शरद पवार यांची साथ सोडणार नसल्याचे सांगत या संधी नाकारल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. ज्याला जिथे जायचे असेल जाऊ द्या आणि शहराचा विकास जनतेच्या समोरच आहे. या कामांचेही कुणाला श्रेय घ्यायचे असेल तर ते घेऊ द्या. मला त्या वादात पडायचे नसल्याचेही म्हटले.

बुधवारी जितेंद्र आव्हाड हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुंबईत भेटल्याचे वृत्त काही वृत्तवाहीन्यांनी दाखविले होते. मात्र हे वृत्त चुकीचे असून मी शिंदे यांना नाही तर नगरविकास विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी गेलो होते, असे त्यांनी स्पष्ट केले. मला अटक करुन जेव्हा माझ्यावर ३५४ चा गुन्हा दाखल केला, तेव्हाच त्यांना मी शेवटचा भेटलो होतो. आता कोणतीही गुन्हा दाखल केला तर त्यासाठी माझी तयारी आहे. रणांगणामध्ये उतरल्यावर परिणामांची पर्वा करायची नसते आणि या काळात केवळ लढायचे असते. त्यामुळे मीही लढतोय, असेही ते म्हणाले.

- Advertisement -

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ माजी नगरसेवक नजीब मुल्ला यांनी कुठेही प्रतिक्रीया दिलेली नसतानाही त्यांना बदनाम करण्याचे काम सुरु आहे. मुल्ला हे पक्ष सोडणार नाहीत, हे मी सुरुवातीपासूनच सांगत आहे. आता राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीही मुल्ला पक्ष सोडणार नसल्याचे सांगितले आहे. मुल्ला हे दिल्लीत बँकेच्या बैठकीला गेले आहेत. त्यामुळे अजित पवार यांनी घेतलेल्या नगरसेवकांच्या बैठकीला मुल्ला हे उपस्थित नव्हते अशी माहिती आव्हाड यांनी दिली.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -