घरमहाराष्ट्रचूक मान्य केल्यावरही फडणवीस सत्तेसाठी पुन्हा संधी साधू शकतात

चूक मान्य केल्यावरही फडणवीस सत्तेसाठी पुन्हा संधी साधू शकतात

Subscribe

अजितदादांसोबत सत्ता स्थापन करणे ही चूक होती, असे फडणवीस म्हणत असले तरी अजूनही असा प्रसंग आला किंवा एखाद्या पक्षाने त्यांना ऑफर दिली तरी ते सत्ता स्थापन करतील, असा टोला राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी लगावला आहे. सत्ता गेल्यापासून देवेंद्र फडणवीस अस्वस्थ आहेत. सत्ता स्थापन करण्यासाठी ते आजही तळमळत आहेत, अशी कोपरखळी खडसे यांनी लगावली. खडसे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना फडणवीसांवर टीका करण्याची संधी सोडली नाही. सत्तेत गेल्यापासून फडणवीस अस्वस्थ आहेत.

तर दुसरे भाजपचे नेते चंद्रकांत पाटील वाटेल तसे बडबडत सुटले आहेत. महाविकास आघाडी सरकार जन्माला आल्यापासून हे सरकार पडणार असल्याचे चंद्रकांत पाटील सांगत असून सरकार पडणार असल्याच्या चंद्रकांतदादांनी दोन तारखाही दिल्या. फडणवीसांनीही तारीख निश्चित केली होती; पण काही होत नाही. सरकार काही जात नाही. विरोधक वाट बघत आहेत. ते वाटच बघत राहतील, असा टोला त्यांनी लगावला. खरे सांगायचे तर राज्यातील आघाडी सरकार दिवसेंदिवस मजबूत होत आहे. भाजपमधील आमदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. नाराजांची संख्या वाढू नये म्हणून आपले सरकार येणार असे आमदारांना सांगून वेळ मारून नेली जात आहे, असा दावाही त्यांनी केला.

- Advertisement -

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस गेल्या आठवड्यात जळगावच्या दौर्‍यावर होते. यावेळी ते खासदार रक्षा खडसे यांच्या निवासस्थानीही गेले होते. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधताना राज्यातील सत्तांतराचे संकेत दिले होते. सध्या कोविडचा काळ आहे. आमचे सर्व लक्ष त्याकडे आहे. राजकीय सत्तांतर वगैरेकडे आमचे लक्ष नाही. देणार नाही. एकदा संकट गेलं तर बघू, असे सूचक विधान फडणवीस यांनी केले होते. त्यामुळे राज्यात सत्तांतर होण्याच्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -