घरमहाराष्ट्ररक्ताच्या प्रत्येक थेंबाच, अश्रुंच उत्तर मिळेल- मोदी

रक्ताच्या प्रत्येक थेंबाच, अश्रुंच उत्तर मिळेल- मोदी

Subscribe

भारतीय कोणाच्या वाटेला जात नाही आणि जो वाटेला जातो त्याला सोडत नाही. धुळ्यातील सभेत मोदींनी पाकिस्तानला पुन्हा एकदा ठणकावले.

शनिवारी एकदिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धुळ्याच्या गोशाळा मैदानावर सभा घेतली. पुलवामातील भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करताना रक्ताच्या प्रत्येक थेंबाच, अश्रूंचं सडेतोड उत्तर मिळेल, असे मोदी म्हणाले. तिन्ही सैन्य दलांना संपूर्ण सूट दिली असून या हल्ल्याला भारतीय जवान चोख प्रत्यूत्तर देतील, असं म्हणत मोदींनी पाकिस्तानला पुन्हा एकदा इशारा दिला आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रतील दोन जवान शहिद झाले आहेत. त्यांना ज्या मातेने जन्म दिला आणि ज्या कुटुंबाचेते सदस्य होते त्यांना मी प्रणाम करतो. भारतीय कोणाच्या वाटेला जात नाही आणि जो वाटेला जातो त्याला सोडत नाही. जग आता भारताची नवीन रिती आणि नीती अनुभवेल.बॉम्ब बनवणारा किंवा टाकणारा, बंदुक चालवणारा किंवा धारक असो कुणालाही आम्ही शांततेने झोपू देणार नाही,असे देखील मोदी म्हणाले.

धुळे करणार सूरतशी स्पर्धा

पंतप्रधान नरेंद्र मोदीनीं धुळ्यात विविध विकास प्रकल्प राष्ट्राला अर्पण केले. तसेच येत्या काही वर्षात धुळे शहर हे गुजरातमधील सूरत या शहराशी स्पर्धा करेल असं मोदी म्हणाले. 1000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे पंतप्रधानांनी लोकार्पण केले. यामध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत निम्न पांझरा मध्यम प्रकल्प, सुलवाडे-जामफळ-कनोली उपसा सिंचन योजना, अमृत योजनेअंतर्गत धुळे शहर पाणी पुरवठा योजना, तापी सिंचन प्रकल्पांचा समावेश आहे.धुळे-नरडाणा रेल्वे मार्ग आणि जळगांव-मनमाड तिसऱ्या रेल्वे मार्गासाठी पंतप्रधानांच्या हस्ते पायाभरणी करण्यात आली. भुसावळ-वांद्रे खान्देश एक्स्प्रेस या रेल्वेला पंतप्रधान व्हिडिओ लिंकद्वारे हिरवा झेंडा दाखवला.धुळे जिल्हा म्हणजे विकासाचा वटवृक्ष असे देखील मोदी म्हणाले.

- Advertisement -

यवतमाळ मध्ये काय म्हणाले मोदी

यवतमाळ येथील कार्यक्रमात त्यांनी तेथील स्थानिक भाषेतून लोकांना संबोधित केले. पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या संदर्भात सांगताना त्यांनी नागरिकांना विश्वास दिला की, पाकिस्तानी आणि दहशतवाद्यांचा बदला घेतला जाईल.पाकिस्तान हा एक असा देश आहे. जो भारताच्या फाळणीनंतर अस्तित्वात आला. जिथे दहशतवाद्यांना आसरा दिला जातो. जो देश सरातळाला पोहोचला आहे. हा देश निस्तनाभूत होण्याच्या मार्गावर आहे. मी देशातील लोकांना आश्वासन देतो की, धीर धरा, जवानांच्या हल्ल्याचा बदला आपले लष्कर जवान घेतील. आपल्या लष्करावर आम्हाल विश्वास आहे, गर्व आहे. त्यांना संपूर्ण सूटही देण्यात आली आहे. दहशतवाद्यांना आणि त्यांना आसरा देणाऱ्यांना शिक्षा नक्कीच होईल असेदेखील मोदी म्हणाले.

 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -