घरमहाराष्ट्रसिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार्‍या प्रत्येकाची होणार रॅपिड टेस्ट... पालकमंत्री उदय सामंत

सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार्‍या प्रत्येकाची होणार रॅपिड टेस्ट… पालकमंत्री उदय सामंत

Subscribe

कोविड सेंटरमध्ये रूग्णांना भेटण्यासाठी येणार्‍या नातेवाईकांचीही कोरोना टेस्ट केली जाणार

प्रतीनिधी- तेजस्वी काळेसकर

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना नियंत्रणासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत. सिंधुदुर्गात येणार्‍या प्रत्येकाची रॅपिड अँटिजन टेस्ट किंवा आरटीपीआर टेस्ट करण्याचे निर्देश देण्यात आले असून त्यानुसार खारेपाटण चेकनाक्यावर आलेल्या प्रत्येकाची टेस्ट केली जातेय. याखेरीज शासकीय रूग्णालयात तसेच कोविड सेंटरमध्ये रूग्णांना भेटण्यासाठी येणार्‍या नातेवाईकांचीही कोरोना टेस्ट केली जाणार असल्याची माहीती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.
दरम्यान सिंधुदुर्गात आरोग्य यंत्रणा चांगल्या पद्धतीने काम करत आहे. आज आपण सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकात आल्यानंतर आरोग्य कर्मचार्‍यांनी थांबवले आणि माझी आरोग्य तपासणी केली. पालकमंत्री म्हणून वेगळा न्याय त्यांनी लावला नाही याचा मलाही अभिमान आहे असे पालकमंत्री उदय सामंत म्हणाले.

येथील तहसील कार्यालयात ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. यात जिल्ह्यातील सर्वच चेकनाक्यावर प्रत्येक प्रवाशाची आरोग्य तपासणी तसेच रॅपिड टेस्ट करण्याचे निर्देश आम्ही दिले आहेत. त्यानुसार आजपासून कार्यवाही सुरू झाली आहे. याखेरीज जिल्ह्यातील कोविड सेंटर तसेच जिल्हा रूग्णालयातील कोविड रूग्णांना भेटण्यासाठी त्यांचे नातेवाईक गर्दी करतात. त्यामुळे या नातेवाईकांचीही कोरोना टेस्ट केली जाणार आहे. हे केवळ त्या रूग्णांच्या नातेवाईकांना त्रास देण्यासाठी नव्हे तर कोरोना नियंत्रणात यावा. जास्तीत जास्त कोरोना रुग्णांवर तातडीने उपचार करता यावेत यासाठी केले जात असल्याचे ते म्हणाले.

- Advertisement -

हे हि वाचा – नारायण राणे खुर्ची मिळत नाही वेडेपिसे झाले आहेत – विनायक राऊत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -