घरमहाराष्ट्रएक डोस घेतलेल्यांना दिवाळीनंतर सर्व खुले!

एक डोस घेतलेल्यांना दिवाळीनंतर सर्व खुले!

Subscribe

मॉल आणि रेल्वेच्या लोकलमध्येही मिळणार प्रवेश, एक डोस घेतलेल्यांना मोठा दिलासा

मुंबई – राज्यात कोरोनाचा प्रभाव कमी होत असल्यामुळे हळूहळू संपूर्ण अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यातच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी एक आनंदाची बातमी दिली आहे. दिवाळीनंतर कोरोनाची एक लस घेतली असेल तरीही त्यांना सर्व खुले होणार आहे. एक डोस घेतलेल्या नागरिकांना मॉल, लोकल आणि अन्य निर्बंध टाकलेल्या ठिकाणीही प्रवेश दिला जाणार आहे. दिवाळीत कोरोना रुग्ण संख्येचा आढावा घेऊन लोकांना होणार्‍या या असुविधेतून वाचवण्यासाठी लसीची एक मात्रा देखील पुरेशी ठरणार आहे. टास्क फोर्सच्या सहमतीने मुख्यमंत्री दिवाळीनंतर निर्णय घेतील, असे टोपे म्हणाले.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत चालला असल्याने अनेक नियमांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. आता महाराष्ट्र हळूहळू संपूर्ण अनलॉक होण्याच्या दिशेने प्रवास करत आहे. शाळा, मंदिरे सुरू झाली आहेत. त्यातच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी एक महत्त्वाची माहिती दिली. ते म्हणाले की, आताच दसरा झाला आहे. दिवाळी येतेय. संपूर्ण सणामध्ये लोक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. मंदिरे, थिएटर्स उघडली आहेत. आता यानंतर कोरोना रुग्णांची संख्या कमी वाढते या सर्व पार्श्वभूमीवर निर्णय होईल, असे ते म्हणाले. संख्या आटोक्यात राहिली तर सवलत मिळेल, असे ते म्हणाले. आरोग्य सेतू अ‍ॅपमध्ये जर ‘सेफ’ असे स्टेटस आल्यास सवलती मिळू शकतील. राज्यामध्ये दिवाळीनंतरच्या कोरोना आकडेवारीनंतर आरोग्य विभागाशी चर्चा करून मुख्यमंत्री निर्णय घेतील, असे टोपे म्हणाले.

- Advertisement -

टोपे म्हणाले की, राज्यात मोठ्या स्तरावर हर्ड इम्युनिटी आलेली असेल आणि टास्क फोर्स, आरोग्य विभागाची सहमती असेल तर असा निर्णय घेतला जाऊ शकतो. कोविशील्डच्या पहिल्या डोसनंतर 84 दिवसांचा कालावधी दुसर्‍या डोससाठी दिला आहे. त्यामुळे मोठे अंतर असल्याने असुविधा होते. त्यामुळे आरोग्याची बाब लक्षात घेऊन यावर निर्णय होईल, असेही टोपे म्हणाले. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने राज्य सरकार अनेक गोष्टी अनलॉक करत आहेत. राज्य सरकारने नुकतेच शाळा, मंदिरे सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर 22 ऑक्टोबरनंतर सिनेमागृहे आणि नाट्यगृहे सुरू होणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -