घरमहाराष्ट्रपुणेकुणबी नोंदी सापडल्याचे पुरावे लपवून ठेवले, मनोज जरांगेंचा भरसभेत दावा

कुणबी नोंदी सापडल्याचे पुरावे लपवून ठेवले, मनोज जरांगेंचा भरसभेत दावा

Subscribe

ज्या समित्यांना मराठ्यांना आरक्षणासाठी कुणबी नोंदी शोधण्यास सांगितले. त्या समित्यांना त्या नोंदी सापडून देखील त्यांनी त्या लपवून ठेवल्या, असा आरोप पुण्यातील खराडी येथील सभेतून मनोज जरांगे पाटील यांच्याकडून करण्यात आला आहे.

पुणे : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी राज्यभरातील मराठा समाज हा एकवटला आहे. मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाचे नेतृत्व करत आहे. राज्यभरातील त्यांच्या दौऱ्याला सुरुवात झाली असून ते प्रत्येक जिल्ह्यात जाऊन मराठा समाजाला एकत्र येण्याचे आवाहन करत आहेत. आज (ता. 20 नोव्हेंबर) पुण्यातील खराडी येथे जरांगे यांची जाहीर सभा पार पडली. नेहमीप्रमाणे मोठ्या संख्येने मराठा समाज या सभेला उपस्थित होता. यावेळी त्यांनी मराठा समाजाला आरक्षणासाठी संघर्ष करण्याचे आवाहन केले. त्यासोबतच या आधी ज्या समित्यांना मराठ्यांना आरक्षणासाठी कुणबी नोंदी शोधण्यास सांगितले. त्या समित्यांना त्या नोंदी सापडून देखील त्यांनी त्या लपवून ठेवल्या, असा आरोप या सभेतून जरांगे पाटील यांच्याकडून करण्यात आला आहे. (Evidence of discovery of Kunbi records was hidden, Manoj Jarange Patil claims)

हेही वाचा – “ज्यांना मोठे केले तेच आज…”, पुण्यातील सभेतून मनोज जरांगेंनी नेत्यांवर साधला निशाणा

- Advertisement -

राज्यभरात कुणबी नोंदी सापडण्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले की, याआधीही मराठ्यांचे कुणबी म्हणून पुरावे सापडत असताना ते सापडत नसल्याचे सांगितले गेले. ज्या समित्या यासाठी नेमण्यात आल्या होत्या, त्या समित्यांनी पुरावे लपवून ठेवले. मराठ्यांनी डोळे झाकून विश्वास ठेवला. नोंदी सापडत नसल्याने मराठा त्यामुळे थंड बसला. परंतु, तेव्हा विश्वास ठेवला आणि विश्वासाचा घात झाला. 1805 पासून 1967 पर्यंत आणि 1967 पासून ते 2023 पर्यंत सगळे पुरावे शोधण्याचे काम सुरू झाले आहे. ओबीसी प्रवर्गत मराठे असल्याचे समोर आले आहे. राज्यात आतापर्यंत 29 लाख नोंदी सापडल्या आहेत. मग जर मराठा आरक्षणात येतो. तर 70 वर्षांपासून मराठ्यांचे कुणी वाटोळे केले याचे उत्तर द्या. आरक्षण कोणी मिळू दिल नाही त्याचे नाव आम्हाला द्या. आमचे भविष्य यांनी पूर्ण उध्वस्त केले आहे. आम्हाला 70 वर्षाआधी आरक्षण दिले असते तर जगात प्रबळ जात म्हणून एक नंबरला मराठे राहिले असते. आमचा नोकरीतला टक्का घसरला आणि ज्याची लायकी नाही त्याच्या हाताखाली काम करण्याची वेळ आमच्यावर आली, असा थेट हल्लाबोल जरांगे यांनी केला.

आरक्षण देताना देखील आम्ही कधीच भेदभाव केला नाही. याला जास्त का आणि आम्हाला कमी का असा सवाल कधीच केला नाही. स्वतःच्या हक्काचे आरक्षण दुसऱ्याला दिले. पण घेऊ नका, असे म्हटलं नाही. आरक्षण सगळ्यांना देऊ दिले. सगळ्यांसाठी माझा बांधव उभा राहिला. आम्ही सगळ्या समाजाला सढळं हाताने मदत केली. आम्ही आरक्षण देताना कधीच मागे पुढे बघितले नाही आणि आजही दुसऱ्यांना मदत करताना आमचा हात मागे पुढे सरकत नाही. माझ्या समाजाचा विश्वास प्रबळ होता. आम्ही देशात कधीच कुणाला कमी पडू दिले नाही. सगळ्या जातीतल्या लोकांना मदत करणारा हा समाज आहे. कुणावर संकट आले तर छातीचा कोट करून आम्ही थांबलो. कधीच कुणाला कमी लेखले नाही. जातीवाद न करण्याचे संस्कार आमच्यावर होते. त्याच पावलावर पाऊल ठेवत आपण पुढे जात आहोत. आमच्या हक्काच्या आरक्षणाची मागणी करत आहोत, असे पुन्हा जरांगे यांच्याकडून पुन्हा बोलून दाखवण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -