Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रMahadev Jankar : "EVM हॅक करता येऊ शकते, आय एम अल्सो इंजिनियर,...

Mahadev Jankar : “EVM हॅक करता येऊ शकते, आय एम अल्सो इंजिनियर, आय…”, महादेव जानकरांचा मोठा दावा

Subscribe

Mahadev Jankar On Congress And Ncp : ईव्हीएम'च्या विरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी पक्ष हे आमच्यासोबत आले, तर स्वागत आहे, असं जानकरांनी म्हटलं.

विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या यशामागे ‘ईव्हीएम’मधील फेरफार असल्याचा दाट संशय महाविकास आघाडीकडून व्यक्त केला जात आहे. पण, ‘ईव्हीएम’मध्ये फेरफार करता आली असती, तर लोकसभा निवडणुकतही विजय मिळवला असता, असं मत भाजप आणि महायुतीच्या नेत्यांकडून मांडलं जात आहे. यातच भाजपचे जुने मित्र असलेले राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष, महादेव जानकर यांनीही ‘ईव्हीएम’वर संशय व्यक्त केला आहे.

‘ईव्हीएम’ हॅक करता येऊ शकते. लोकशाही जिवंत ठेवायची असेल, तर बॅलेट पेपर आणावेत, असं म्हणत जानकर यांनी भाजपला आव्हान दिलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

- Advertisement -

हेही वाचा : ‘CM’पद ‘Bjp’ कडे, दुसऱ्या क्रमांकासाठी शिंदे अन् अजितदादांमध्ये रस्सीखेच; भाजपचे बडे नेते म्हणाले, “तिघेही…”

महादेव जानकर म्हणाले, “‘ईव्हीएम’ हॅक करता येते. आय एम अल्सो दी इंजिनियर. आय नो दॅट… विमान हॅक करता येऊ शकते, तर ‘ईव्हीएम’ हॅक करता येऊ शकत नाही का? लोकशाही जिवंत ठेवायची असेल, तर केंद्र आणि राज्य सरकारनं बॅलेटपेपर आणावेत. आम्ही त्यांचं स्वागत करू.”

- Advertisement -

“साताऱ्यात तीन उमेदवारांना समान मतदान कसं काय पडू शकते? लोकशाही जिवंत ठेवायची असेल, तर ‘ईव्हीएम’ बॅन केले पाहिजे. सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग, माध्यम, उद्योगही सुद्धा भाजपच्या ताब्यात आहेत. चारही स्तंभावर भाजपचे अधिराज्य असेल, तर ही लोकशाही नाही,” अशी टीका जानकर यांनी केली आहे.

“एक-दोन आमदार असलेल्या पक्षांची अवस्था म्हणजे शेपटीही झाकत येत नाही आणि शरीरही झाकता येत नाही,” असंही जानकर यांनी म्हटलं आहे.

“‘ईव्हीएम’च्या विरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी पक्ष हे आमच्यासोबत आले, तर स्वागत आहे. ‘ईव्हीएम’मुळे देशातील लोकशाही धोक्यात आली आहे. त्याला केंद्र आणि राज्य सरकार जबाबदार आहे,” असा आरोप जानकर यांनी केला आहे.

हेही वाचा : राऊतांनी म्हटलं, ‘एकनाथ शिंदेंचं मानसिक संतुलन बिघडलंय’; सेनेच्या आमदाराने धू-धू धुतले; म्हणाले, “चार घरचा…”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -