घरमहाराष्ट्रआजी-माजी मुख्यमंत्र्यांची 'बापा'वरून जुंपली; दसरा मेळाव्यात ठाकरे-शिंदेंनी ओढले शाब्दिक आसूड

आजी-माजी मुख्यमंत्र्यांची ‘बापा’वरून जुंपली; दसरा मेळाव्यात ठाकरे-शिंदेंनी ओढले शाब्दिक आसूड

Subscribe

भर मेळाव्यात दोन्ही आजी-माजी मुख्यमंत्र्यांनी एकमेकांच्या वडिलांचा उल्लेख करत टीका केली आहे.

मुंबई – यंदाचा दसरा मेळावा अटीतटीचा ठरला आहे. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्याच्या व्यासपीठावर एकमेकांवर शाब्दिक आसूड ओढले. तसंच, भर मेळाव्यात दोन्ही आजी-माजी मुख्यमंत्र्यांनी एकमेकांच्या वडिलांचा उल्लेख करत टीका केली आहे.

हेही वाचा – आई-वडिलांची आणि शिवरायांची शपथ घेऊन सांगतो…, युतीवरून ठाकरे शिवाजी पार्कात कडाडले

- Advertisement -

‘ही तर बाप चोरणारी औलाद. बापाचा तरी विचार करायचा. त्यांना काय वाटलं असेल. हे काय कार्ट जन्माला आलं, माझं नाव सोडून दुसऱ्या मुलाच्या बापाचं नाव लावतंय’, अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. एकनाथ शिंदेंकडून सतत शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरेंच्या नावाचा उल्लेख केला जातो. त्यांच्या नावावरून राजकारण केलं जातं, असा आरोप उद्धव ठाकरेंच्या गटाकडून करण्यात येतो. त्यामुळे माझ्या बापाच्या नावाने राजकारण करण्यापेक्षा स्वतःच्या बापाच्या नावाने लोकांकडे मतं मागा, असं थेट आव्हान उद्धव ठाकरेंनी अनेकदा जाहीर भाषणांतून केलं आहे. यावेळीही त्यांनी थेट एकनाथ शिंदे यांना आव्हान करत बाप चोरणारी औलाद अशी घणाघाती टीका केली आहे.

हेही वाचा सोनिया गांधींच्या पायावर 10 वर्षे लोटांगण घालून मंत्रिपदं भोगली, सुषमा अंधारेंचा राणेंवर घणाघात

- Advertisement -

एकीकडे उद्धव ठाकरेंचं शिवाजी पार्कवरील भाषण संपत नाही तोवर तिकडे बीकेसीतून मुख्यमंत्री एकनात शिंदे यांच्या भाषणाला सुरुवात झाली. उद्धव ठाकरेंच्या संपूर्ण भाषणाचा एकनाथ शिंदेंनी समाचार घेतला. बाप चोरणारी औलाद अशी टीका झाल्याने एकनाथ शिंदेंनीही ठाकरेंवर शाब्दिक आसूड ओढले. तुम्ही तर बापाचे विचारच विकले, बापालाच विकण्याचा प्रयत्न केला, असा घणाघात एकनाथ शिंदेंनी केला. सत्तेसाठी तुम्ही हिंदुत्त्वासाठी तिलांजली दिली. सत्तेसाठी तुम्ही लाचार झाला. सत्तेसाठी भरकटलात. २५ वर्ष आम्ही सडलो असे बोलताना तुम्हाला काही वाटलं नाही का. तुम्हीच हिंदुत्वाचा विचार आणि बाळासाहेब यांच्याशी गद्दारी, असा रोखठोक बाणही एकनाथ शिंदेंनी ठाकरेंकडे सोडला.

हेही वाचा

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -