जनतेसाठी नाही, तर स्वार्थासाठी युती केली – नारायण राणे

भाजप शिवसेना यांनी सत्तेत आल्यापासून एकमेकांवर टीका केल्या आहेत. या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचा राग अजूनही शांत झालेला नाही त्यामुळे या समिकरणाचा फायदा होणार नसल्याचे वक्तव्य खासदार नारायण राणे यांनी केले आहे.

Narayan rane
नारायण राणे यांचा गौप्यस्फोट

भाजप-शिवसेना युती झाल्यानंतर राजकीय पक्षांकडून टीकेची झोड उडवण्यात येत आहे. मनसे, राष्ट्रवादी आणि स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नितेश राणे यांनी टीका केल्यानंतर आता खासदार नारायण राणे यांनी युतीवर जोरदार टीका केली आहे. मुंबईत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी युतीवर टीका केली आहे. दोन्ही पक्षांनी महाराष्ट्रातील जनतेसाठी नाही तर स्वतःच्या स्वार्थासाठी युती केली असल्याचे राणे यांनी म्हटलं आहे. आगामी निवडणुकीत स्वाभिमान पक्ष स्वतंत्र निवडणूक लढवेल यावेळी त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रात यावेळी युतीच्या २५ हून जागा येणार नाही यामध्ये शिवसेना १० जागांवर जात नसल्याचा टोला त्यांनी लगावला आहे.

काय म्हणाले नारायण राणे

“शिवसेने सांगण्यावरून मला सत्तेत घेतले नाही. मुंबई महानगर पालिकेत सर्वात जास्त भ्रष्टाचार होतो म्हणून सत्तेत राहण्यासाठी शिवसेनेने ही युती केली आहे. मुंबईतून मराठी माणूस हरवायला शिवसेना जवाबदार आहे. मागील साडे चार वर्षांपासून दोन्ही पक्ष एकमेकांवर आरोप करत आहेत. याचा राग अजूनही कार्यकर्त्यांमध्ये आहे. हा राग अजून कार्यकर्त्ये अजून विसरले नसल्यामुळे या युतीचा फायदा होणार नाही. कालच युती झाली मात्र यामध्ये कोणाच्या चहेऱ्यावर आनंद दिसत नव्हता. निवडणूक स्वबळावर लढवणार असल्याचा दावा शिवसेनेकडून केला जात होता. आता त्याचे काय झाले? या युतीचा फायदा दोन्ही पक्षांना होणार नाही. शिवसेना डरकाळी नाही तर आता म्याव म्याव करायला लागली आहे.” – नारायण राणे