देवेंद्र फडणवीस यांची जिल्हा रूग्णालयात कोरोनाबाधित रूग्णांशी चर्चा

माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज सकाळी नाशिक दौर्‍यावर आले असता त्यांनी जिल्हा रूग्णालयास भेट दिली. यावेळी त्यांनी रूग्णालयातील डॉक्टर व कोरोनाबाधित रूग्णांशी संवाद साधला.

नाशिक जिल्ह्यात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. वाढत्या रूग्णसंख्येमुळे आरोग्य विभागावर ताण वाढला आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा रूग्णालयास भेट देत कोरोनाबाधित रूग्णांशी चर्चा केली. यावेळी माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.